Asian Games Postponed: आशियाई क्रिडा स्पर्धा पुढं ढकलली, आशियाई ऑलिम्पिक परिषदेचा मोठा निर्णय
Asian Games Postponed: चीनच्या हांगझू येथे 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान होणारी एशियन गेम्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आलीय.
Asian Games Postponed: चीनच्या (China) हांगझो येथे 10 ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. चीन ऑलिम्पिक समिती आणि हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजन समिती यांच्याशी चर्चा करून आशियाई ऑलिम्पिक परिषदेनं आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. आशियाई ऑलिम्पिक परिषदेनं जाहीर केलेल्या नव्या तारखांनुसार, पुढच्या वर्षी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबर 2023 ही स्पर्धा पार पडेल. महत्वाचं म्हणजे, ही स्पर्धा पुढे का ढकलली? यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. परंतु, चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असं म्हटलं जातंय.
यावर्षी 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनची आर्थिक राजधानी शांघायपासून 175 किलोमीटर दूर असलेल्या हांगझो येथे ही स्पर्धा पार पडणार होती. परंतु, याच दरम्यान आशियाई ऑलिम्पिक परिषदेनं स्पर्धा पुढे ढकल्याचा निर्णय घेतलाय. आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकल्यामागचं कोणतंही कारण दिलं गेलं नाही. मात्र चीनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
ट्वीट-
शियाई ऑलिम्पिक परिषदेचं स्पष्टीकरण
"गेल्या दोन महिन्यांपासून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नव्या तारंखाबाबत टास्क फोर्सनं ऑलिम्पिक समिती हांगझो क्रिडा आयोजन समिती आणि महत्वाच्या लोकांशी चर्चा केली. तसेच कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जाणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे", असं स्पष्टीकरण आशियाई ऑलिम्पिक परिषदेनं दिलंय.
आशियाई ऑलिम्पिक परिषदेनं चीनी सरकारचे आभार मानले
आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यकारी मंडळानं टास्क फोर्सनं निवडलेल्या तारखांनाही सहमती दर्शवली आहे. त्याच बरोबर, प्रशासकीय मंडळानं महामारीच्या काळात खेळांच्या तयारीसाठी कठोर परिश्रम घेतल्याबद्दल आणि पुढील वर्षी खेळ होणार याची खात्री केल्याबद्दल चिनी आयोजक आणि सरकारचे आभार मानले आहेत.
हे देखील वाचा-
- Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा विरुद्ध धनकड; उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
- Covid-19 : देशात दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट, 15 हजार 528 नवे रुग्ण, 25 रुग्णांचा मृत्यू
- Cloudburst : हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ढगफुटी, जनजीवन विस्कळीत; अनेक संसार ढिगाऱ्याखाली