एक्स्प्लोर

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला रौप्य पदक मिळणार? आज IOA च्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे बाजू मांडणार

Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या वतीनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी. ज्येष्ठ वकील हरिश साळवे कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये बाजू मांडणार आहे. 

Vinesh Phogat Get Medal Or Not : विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) अपात्र ठरली आणि तिच्यासह कोट्यवधी भारतीयांच्या सुवर्ण स्वप्नांचा चुरडा झाला. निर्धारीत मर्यादेत वजन न बसल्यामुळे विनेशला फायनल सामन्यापूर्वीच अपात्र घोषित केलं गेलं. याच प्रकरणी दाद मागण्यासाठी विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये ( Court of Arbitration for Sport) अर्ज केला होता. हा अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच, या अर्जावर आजच सुनावणी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. विनेश फोगाटच्या वतीनं ज्येष्ठ वकील हरिश साळवे (Harish Salve) कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये बाजू मांडणार आहे. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर आज म्हणजेच, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यानं आपल्या अपात्रतेविरुद्ध CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) मध्ये अर्ज दाखल केला होता, जो सुनावणीसाठी स्वीकारण्यात आला. यामध्ये त्यांनी संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली. क्रीडा न्यायालयानं विनेशला सुनावणीसाठी स्वत:चा वकील नेमण्याची संधी दिली आहे. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार, दुपारी दीड वाजता पार पडणार आहे. 

यापूर्वी सीएएसमध्ये गुरुवारीच सुनावणी होणार होती. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशची बाजू मांडण्यासाठी 4 वकील दिले होते. जोएल मोनलुइस, एस्टेल इव्हानोव्हा, हॅबिन एस्टेल किम आणि चार्ल्स एम्सन अशी त्यांची नावं आहेत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी हे सर्व CAS चे निःशुल्क वकील आहेत. पण भारतीय संघानंही सुनावणीसाठी भारतीय वकील नेमण्यासाठी वेळ मागितला. त्यावर न्यायालयानं त्यांना वेळ देत सुनावणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच, शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

हरीश साळवे IOA ची बाजू मांडणार 

मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगट अपात्रता प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि किंग्स काउंसिल वकील हरीश साळवे आज CAS समोर कुस्तीपटू विनेश फोगाटची बाजू मांडणार आहेत. साळवे यांना आज पॅरिस वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुनावणीला हजर राहावं लागणार आहे. साळवे यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून त्यांचं नाव आयओएचे वकील म्हणून सीएएससमोर सादर करण्यात आलं आहे.

विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा 

भारताची पैलवान विनेश फोगाट हिनं आंतरराष्ट्रीय कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत विनेशनं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. विनेश फोगाटनं आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली आणि मी पराभूत झाली. तुझं स्वप्न, माझी हिम्मत सर्व तुटलंय, यामुळं माझ्यामध्ये अधिक ऊर्जा राहिली नाही. कुस्तीमधील 2001 ते 2024 च्या प्रवासाला अलविदा, तुम्हा सर्वांची ऋणी राहीन, असं विनेश फोगाटनं म्हटलं आहे.  दरम्यान, विनेश फोगाटनं निवृत्ती जाहीर केली असली तरी  तिची बहीण बबिता फोगाटनं ती भारतात परतल्यानंतर वडील महावीर फोगाट तिच्यासोबत चर्चा करतील, अशी माहिती दिली आहे. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget