Tokyo Paralympics 2020 : भारताला धक्का; आजारी असल्याने सुयश जाधव आजच्या स्पर्धेला मुकणार
Tokyo Paralympics 2020 : भारतीय जलतरणपटू सुयश जाधवला सर्दी आणि खोकल्याचा त्रास असल्याने तो स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
Tokyo Paralympics 2020 : टोकियो येथे सुरु असलेल्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला धक्का बसला आहे. भारतीय जलतरणपटू सुयश जाधव आज होणाऱ्या 200 मीटर वैयक्तिक मेडले एसएम 7 या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. सुयश जाधवला सर्दीचा आणि खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुयश जाधवची कोरोना टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे.
भारतीय पॅरॉलिम्पिक दल मिशनचे प्रमुख गुरशरण सिंह यांनी सांगितलं की, सुयश जाधवला हवामान बदलल्याने सर्दीचा त्रास सुरु झाला, तसेच त्याच्या घशात खवखव सुरु झाली. यामुळे तो आजारी पडल्याने शुक्रवारी होणाऱ्या स्पर्धेत त्याने भाग घेऊ नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पण त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सध्या त्याला विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सुयश जाधव हा एकमेव पॅरॉ स्विमर आहे ज्याने 2016 साली झालेल्या रियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेत ‘A’ क्वॉलिफाईंग ग्रेड मिळवलं होतं. जकार्ता येथे 2018 साली आशियायी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुयश जाधवने 50 मीटर बटरफ्लाय एस7 स्पर्धेत गोल्ड मेडल आणि 200 मीटर वैयक्तिक मेडले तसेच 50 मीटर फ्री स्टाईल एस7 मध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. एका अपघातात, वीजेचा करंट लागल्याने सुयश जाधवचे दोन्ही हात कोपऱ्यापासून खाली कापावे लागले होते.
टोकियोत 24 ऑगस्टपासून पॅरॉलिम्पिक सुरुवात होत झाली आहे. पाच सप्टेंबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या खेळांमध्ये भारताच्या वतीनं 9 वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये 54 पॅरा-अॅथलीट्स सहभागी होणार आहेत. यंदाच्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताकडून आतापर्यंतचं सर्वात मोठं दल सहभागी झालं आहे.
टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं आजपासूनचे शेड्यूल :
27 ऑगस्ट
धनुर्विद्या, पुरुष एकेरी रिकर्व इव्हेंट : हरविंदर सिंह, विवेक चिंकारा
धनुर्विद्या, पुरुष एकेरी कंपाउंड इव्हेंट : राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
धनुर्विद्या, महिला एकेरी कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान
धनुर्विद्या, मिश्र संघ कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान
पॉवर लिफ्टिंग, पुरुष एकेरी 65 किलोग्राम इव्हेंट : जयदीप देशवाल
पॉवर लिफ्टिंग, महिला एकेरी 50 किलोग्राम इव्हेंट : सकीना खातून
स्विमिंग, 200 मीटर एकेरी पदक SM7 : सुयश जाधव
28 ऑगस्ट
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफएक) F57 इव्हेंट : रणजीत भाटी
29 ऑगस्ट
अॅथलेटिक्स, पुरुष डिस्कस थ्रो F52 : विनोद कुमार
अॅथलेटिक्स, पुरुष हाय जंप T47 इव्हेंट : निषाद कुमार, राम पाल
30 ऑगस्ट
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी डिस्कस थ्रो F56 : योगेश कठूनिया
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफेक) F46 : सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाझरिया
अॅथलेटिक्स, पुरुष जेवलीन थ्रो (भालाफेक) F64 : सुमित अंटिल, संदीप चौधरी
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1, पुरुषांचा राऊंड वन इव्हेंट : स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल SH1, महिलांचा राऊंड 2 : अवनि लेखरा
31 ऑगस्ट
अॅथलेटिक्स, पुरुषांची हाय जंप T63 इव्हेंट : शरद कुमार, मरीयप्पन थंगावेलू, वरुण सिंह भाटी
अॅथलेटिक्स, महिलांची 100 मीटर रेस : सिमरन
अॅथलेटिक्स, महिलांचा शॉट पट F34 इव्हेंट : भाग्यश्री माधवराव जाधव
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, पुरुषांचा P1 इव्हेंट : मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, महिलांचा P2 इव्हेंट : रूबीना फ्रांसिस
1 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : धरमबीर नॅन, अमित कुमार सरोहा
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL3 : प्रमोद भगत, मनोज सरकार
बॅडमिंटन, महिला एकेरी SU5 : पलक कोहली
बॅडमिंटन, मिश्र दुहेरी SL3-SU5 : प्रमोद भगत आणि पलक कोहली
2 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F35 इव्हेंट : अरविंद मालिक
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL4 : सुहास ललिनाकरे यथिराज, तरुण ढिल्लों
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SS6 : कृष्ण नगर
बॅडमिंटन, महिला एकेरी SL4 : पारुल परमार
बॅडमिंटन, महिला दुहेरी SL3-SU5: पारुल परमार आणि पलक कोहली
पॅरा-कॅनोईंग, महिलांचा VL2 इव्हेंट : प्राची यादव
ताइक्वांडो, महिलांचा K44-49 किलोग्राम इव्हेंट : अरुणा तंवर
नेमबाजी, 25 मीटर पिस्तुल SH1, मिश्र P3 इव्हेंट : आकाश आणि राहुल जाखड
3 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांची हाई जंप T64 इव्हेंट : प्रवीण कुमार
अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F54 : टेक चंद
अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F57 : सोनम राणा
अॅथलेटिक्स, महिलांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : एकता भयान, कशिश लाकरा
स्विमिंग, 50 मीटर बटरफ्लाय S7 : सुयश जाधव, निरंजन मकुंदन
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, पुरुष इव्हेंट : दीपक सैनी
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, महिला इव्हेंट : अवनि लेखरा
4 सप्टेंबर
अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F41 इव्हेंट : नवदीप सिंह
नेमबाजी, 10 मीटर एयर रायफल प्रोन, मिश्र R3 : दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू, अवनी लेखरा
नेमबाजी, 50 मीटर पिस्तुल SH1, मिक्स्ड P4 इव्हेंट : आकाश, मनीष नरवाल, सिंहराज
5 सप्टेंबर
नेमबाजी, 50 मीटर रायफल प्रोन SH1, मिश्र R6 इव्हेंट : दीपक सैनी, अवनी लेखरा, सिद्धार्थ बाबू
संबंधित बातम्या :
- IND vs ENG, 1st Innings Highlights: जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडला मोठी आघाडी, जाणून घ्या दुसरा दिवस कसा होता?
- Neeraj Chopra: 'माझ्या वक्तव्याला आपल्या अजेंड्याचं माध्यम बनवू नका', ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचं आवाहन
- 'आता गोल्डचे लक्ष्य', ऑलिम्पिक गाजवून आलेल्या महिला हॉकी खेळाडूंचा मध्य रेल्वेकडून सन्मान