(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'आता गोल्डचे लक्ष्य', ऑलिम्पिक गाजवून आलेल्या महिला हॉकी खेळाडूंचा मध्य रेल्वेकडून सन्मान
र्ल्ड रेकॉर्ड करणारी वंदना कटारिया, सुपर प्लेयर मोनिका मलिक, सुशीला चानू पुखराम्बम आणि रजनी एतिमारपू या मध्य रेल्वेच्या अधिकारी आहेत. ज्यांचा मोठा सन्मान मध्य रेल्वेने केला.
मुंबई : यावर्षी झालेल्या टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी खेळाडूंनी इतिहास रचला. सर्व भारतीयांच्या आशा त्यांच्यावर होत्या. मात्र कांस्य पदकासाठी त्यांनी जीवतोड मेहेनत करूनही पदक त्यांना जिंकता आले नाही. तरीही पंतप्रधान मोदी यांनी टोकियो मध्ये असताना आणि भारतात परतल्यावर सर्व भारतीयांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या संघातील 18 महिलांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. या 18 पैकी 13 महिला खेळाडू या भारतीय रेल्वेत कामाला आहेत. आणि त्यातही गोल्सची हॅटट्रिक करून वर्ल्ड रेकॉर्ड करणारी वंदना कटारिया, सुपर प्लेयर मोनिका मलिक, सुशीला चानू पुखराम्बम आणि रजनी एतिमारपू या मध्य रेल्वेच्या अधिकारी आहेत. ज्यांचा काल मोठा सन्मान मध्य रेल्वेसने केला.
आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक महिला हॉकी खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी गोल्डन गर्ल्स पैकी गोल्सची हट्रिक मारलेली वंदना कटारिया, मोनिका मलिक, सुशीला चानू पुखराम्बम आणि रजनी एतिमारपू यांनी उपस्थिती लावली होती.
या सर्व मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात टीसी म्हणून काम करत आहेत. महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, मध्य रेल्वे सर्वसाधारणपणे खेळांना आणि विशेषत: हॉकीला प्रोत्साहन देत राहील जेणेकरून खेळाडू देशाला गौरवान्वित करतील. हॉकी टीमच्या या महिला खेळाडूंनी एबीपी माझाशी बातचीत करताना सर्व देशवासीयांचे आभार मानले. ऑलिम्पिक आधीचे आयुष्य आणि नंतरचे आयुष्य पूर्णतः बदलले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या वर्षात गोल्ड मेडल मिळवण्याचे लक्ष्य आमच्या समोर असल्यचे त्या म्हणाल्या.