एक्स्प्लोर

Tokyo Paralympics 2020: आणखी एक गोल्ड! प्रमोद भगतला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण तर मनोज सरकारला कांस्य

Tokyo Paralympics 2020: भारताने आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. प्रथम प्रमोद भगतने सुवर्णपदक जिंकले तर मनोज सरकारने कांस्यपदक जिंकले.

Tokyo Paralympics 2020: टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी आजचा दिवस अतिशय खास होता. भारतीय खेळाडूंनी आज बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. भारताच्या प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL 3 बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. यानंतर, भारताच्या मनोज सरकारने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL3 बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले.

जागतिक क्रमवारीतील नंबर एक असलेल्या पॅरा-शटलर प्रमोद भगतने अंतिम फेरीत डॅनियन बेथेलचा 21-14 आणि 21-17 असा पराभव केला. त्याने यापूर्वी जपानच्या डेसुके फुजीहाराविरुद्ध 21-11 आणि 21-16 असा विजय मिळवला होता जो उपांत्य फेरीत फक्त 36 मिनिटे चालला होता.

India Wins Gold: शूटिंगमध्ये मनीष नरवालनं जिंकलं सुवर्णपदक तर सिंहराजला रौप्यपदक, भारताची पदकसंख्या 15 वर

बॅडमिंटन यावर्षी पॅरालिम्पिक स्पर्धेत डेब्यू करत आहे. जगातील नंबर वन खेळाडू भगत, अशा प्रकारे खेळात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. भुवनेश्वरचा 33 वर्षीय खेळाडू सध्या मिश्र दुहेरी एसएल 3-एसयू 5 वर्गात कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. भगत आणि त्याचा साथीदार पलक कोहली रविवारी कांस्य पदकाच्या प्लेऑफमध्ये जपानच्या डेसुके फुजीहारा आणि अकीको सुगिनो यांच्याशी लढतील.

मनोज सरकारनं कांस्य जिंकलं
भारताच्या मनोज सरकारने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL3 बॅडमिंटन स्पर्धेतही चमत्कार केला. त्याने ब्रॉन्ज अर्थात कांस्यपदक जिंकले. मनोजने जपानच्या डेसुके फुजीहाराचा सरळ गेममध्ये 22-20 आणि 21-13 असा पराभव केला. हा सामना 47 मिनिटे चालला.

Avani Lekhara Wins Bronze : अवनी लेखराचा अजून एका पदकावर निशाणा, कांस्यपदक जिंकलं, भारताचं बारावं पदक

पॅरालिम्पिकमध्ये भारताचं अजून एक पदक निश्चित
पॅरालिम्पिकमध्ये आज सकाळी दोन पदकं भारताच्या खात्यात आल्यानंतर आता आणखी एक पदक निश्चित झालं आहे.  पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर (Krishna Nagar) फायनलमध्ये पोहोचला आहे. तो उद्या सुवर्णपदकासाठी लढणार आहे. या लढतीत तो जिंकला तर भारताला अजून एक सुवर्णपदक मिळेल. तो यात पराभूत जरी झाला तरी त्याचं रौप्यपदक निश्चित आहे. आज झालेल्या सेमीफायनलमध्ये त्यानं ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raosaheb Danve Jalna Vote :  पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्कMurlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत रोमाँटिक झाली 'तारक मेहता...'ची सोनू; गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, लवकरच अडकणार लग्नबंधनात
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Embed widget