Delhi Blast: भारतात हमास सारखा हल्ला करण्याची योजना; ड्रोन, बॉम्ब अन् लहान रॉकेट बनवले जात होते, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा
Delhi Bomb Blast Investigation : दिल्लीतील भीषण स्फोटासंबंधीच्या (Delhi Blast) तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. अशातच आता या प्रकरणाच्या चौकशीतील सर्वात मोठा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

Delhi Bomb Blast Investigation दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटासंबंधीच्या (Delhi Blast) तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. अशातच आता या प्रकरणाच्या चौकशीतील सर्वात मोठा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. भारतात देखील हमासच्या शैलीत हल्ल्याची तयारी सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. देशात ड्रोन बॉम्ब आणि लहान रॉकेटच्या माध्यमातून मोठा घातपात करण्याची योजना तयार केली जात होती, अशी देखील माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.
दरम्यान, अनेक देशांमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यांमधून दहशतवादी धडा घेत शिकत होते. दिल्ली स्फोटात (Delhi Blast) मारला गेलेला डॉ. उमर नबीच्या प्रमुख सहकाऱ्याने अटकेतील चौकशीत हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Delhi Bomb Blast Investigation : ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून हल्ल्याची तयारी
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीतील सर्वात खळबळजनक खुलासा समोर आला आहे. दहशतवादी नेटवर्कने भारतात मोठ्या हल्ल्याची तयारी केली होती. दहशतवादी कटात दुसऱ्या अटकेनंतर हि महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. उमरचा प्रमुख सहकारी जसीर बिलालने दहशतवाद्यांची योजना उघड केलीय. इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्लाप्रमाणे देशात मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली होती.
सीरिया, गाझा आणि अफगाणिस्तानमधील ड्रोन हल्ल्यांवर अभ्यास
ज्यामध्ये ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून हल्ल्याची तयारी सुरू होती. दहशतवादी नेटवर्क बॉम्ब बनवण्यासाठी ड्रोनमध्ये बदल करण्यात व्यस्त होते. त्यात ड्रोनवर कॅमेरे आणि बॅटरीसह लहान बॉम्ब बसवण्याची योजना होती. तर गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्याचा बेत आखण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, सीरिया, गाझा आणि अफगाणिस्तानमधील ड्रोन हल्ल्यांवर अभ्यास देखील करण्यात आल्याची माहिती आहे.
ED : अल-फलाह ट्रस्ट आणि फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित 24 ठिकाणी छापे
दुसरीकडे, मंगळवारी (18 नोव्हेंबर) सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीतील ओखला येथील अल-फलाह ट्रस्ट आणि फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित 24 ठिकाणी छापे टाकले. मनी लाँड्रिंग (PMLA) प्रकरणांतर्गत ही कारवाई करण्यात आली. विद्यापीठ आणि त्याच्याशी संबंधित मालकांनी आणि व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे त्यांच्या परिसरात कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे शोधले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने मंगळवारी सकाळी अल-फलाह ट्रस्टचे ओखला येथील मुख्य कार्यालय, विद्यापीठ परिसर आणि व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींच्या खाजगी घरांसह अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. दिल्लीतील जामिया नगर आणि ओखला विहारपासून ते फरिदाबादमधील सेक्टर 22 येथील विद्यापीठ परिसरापर्यंत ईडीच्या अनेक पथके सकाळपासून तैनात करण्यात आली आहेत.
Who is Doctor Umar: डॉ. मोहम्मद उमर कोण आहे?
उमर हा हरियाणातील फरीदाबाद येथील अल फला मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. तपास यंत्रणांना संशय आहे की, तो फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेला आहे. उमर हा अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आदिल अहमद राथेरचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते. ज्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. आदिलच्या चौकशीनंतर सोमवारी फरीदाबादमध्ये छापा टाकण्यात आला आणि उमरचे नाव समोर आले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी उमरची आई शहेमा बानो आणि भाऊ आशिक आणि झहूर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूत्रांचा दावा आहे की, उमरने त्याच्या दोन साथीदारांसह कट रचला आणि फरीदाबादमध्ये अटक झाल्यानंतर घाबरून तो अंमलात आणला.
आणखी वाचा
























