Advay Hiray joins BJP: उद्धव ठाकरेंना जबर धक्का, अद्वय हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार, नाशिकमध्ये ठाकरे गटाची वाताहात
Advay Hiray joins BJP: ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Advay Hiray joins BJP: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांसाठी सोमवारी (ता. 17) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आपले महत्त्वाचे ‘पत्ते’ उघड केले असताना नाशिकमध्ये मात्र मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
Advay Hiray joins BJP: नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; अद्वय हिरे भाजपमध्ये
उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी अखेर आपल्या राजकीय भूमिकेत मोठा बदल करत शिवसेनेचा निरोप घेतला आहे. हिरे आज मंगळवारी (ता. 18) मुंबईतील भाजप कार्यालयात अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या, त्या अखेर स्वतः हिरे यांनीच पुष्टी करत या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. हिरे यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय समीकरणात भाजपची ताकद आणखी वाढणार असून उद्धव ठाकरे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Advay Hiray joins BJP: दादा भुसे विरुद्ध हिरे; पुन्हा एकदा नाशिकमध्ये राजकीय टक्कर
दरम्यान, अद्वय हिरे यांच्यासोबत अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शेवाळे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने स्थानिक पातळीवरील भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. दरम्यान, मालेगाव बाह्य मतदारसंघात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची पकड मजबूत होत चालली आहे अशा चर्चा असतानाच, भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांनी महायुतीत प्रवेश करीत पुन्हा एकदा राजकीय पुनरागमन साधले आहे. विधानसभा निवडणुकीत हिरे यांनी दादा भुसे यांना कडवी झुंज दिली होती, त्यामुळे त्यांच्या नव्या राजकीय पावलाने स्थानिक राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
Raju Shinde joins BJP: राजू शिंदे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार
नाशिक जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असताना, आणखी एक मोठे घडामोडींचे प्रकरण पुढे आले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सोडून काही महिन्यांपूर्वी बाहेर पडलेले राजू शिंदे आता पुन्हा एकदा भाजपमध्ये पुनरागमन करत आहेत. आज मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राजू शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत उबाठा (ठाकरे गट) कडून संजय सिरसाट यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना तब्बल 16 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पराभवानंतर त्यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र भूमिका घेतली होती. यानंतर आता राजू शिंदे पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
आणखी वाचा
























