Tokyo Olympics 2020 Live: भारताच्या आशेला मोठा धक्का बसला; पैलवान बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत
कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12 ने पराभव पत्करावा लागला असला तरीही तो देशाला कांस्यपदकावर नेऊ शकतो.
Tokyo Olympics 2020 : सकाळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाल्यानंतर देशवासियांच्या नजरा कुस्तीपटू बजरंग पुनियावर खिळल्या होत्या. पण पदकासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या कुस्तीपटू बजरंग पुनियाची निराशा झाली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12 असे पराभूत व्हावे लागले.
कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइल उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12 ने पराभव पत्करावा लागला असला तरीही तो देशाला कांस्यपदकावर नेऊ शकतो.
दुसऱ्या फेरीत हाजीने बजरंगवर पूर्णपणे वर्चस्व ठेवले आणि चार गुण मिळवले. मात्र, बजरंगने पुन्हा दोन गुण घेतले आणि अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण हाजीने त्याला चितपट करत पुन्हा एक गुण घेतला. यानंतर बजरंगने दोन गुण घेतले आणि सामना रोमांचक झाला होता. मात्र, हाजीने पुन्हा दोन गुण मिळवले. हाजीने सामना एकतर्फी करून आणखी एक गुण जिंकला. दुसऱ्या राऊंडमध्ये हाजीने 8-4 अशी आघाडी घेतली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग भारताकडून सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण, त्याचे सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न भंगले. मात्र, त्याला अजूनही कांस्यपदक आणण्याची संधी आहे. तत्पूर्वी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बजरंगने इराणच्या मुतार्झा घियासी चेकाचा 2-1 असा पराभव केला.
बजरंगने आज सकाळी दमदार विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. या सामन्यात बजरंगचा सामना किर्गिस्तानच्या इरनझार अकमतालेवशी होता. अंतिम स्कोअर 3-3 होता. पण, पहिल्याच फेरीत तो अधिक गुण मिळवण्यात यशस्वी झाला म्हणून त्याला विजेता घोषित करण्यात आले.
गुरुवारी रवि दहियानं मिळवलं रौप्यपदक
भारताला टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. कुस्तीमध्ये पैलवान रवि दहियाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती, पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीत रवि दहियानं पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं रौप्यपदक जिंकले आहे.
रवि कुमार दहियाचा सामना रूसीचा पैलवाना जवुर यूगेव सोबत होता. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी चार कोटी रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे. सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पैलवान रवि दहियाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "रवि कुमार दहिया एक उत्कृष्ट पैलवान आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. भारताला त्यांचा अभिमान आहे."