Tokyo Olympics : भारतीय हॉकी टीम अन् सोनम मलिकवर साऱ्यांच्या नजरा, काय आहे 3 ऑगस्टचं भारताचं शेड्यूल?
Tokyo Olympics 2021 3 August Schedule : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज, मंगळवार (3 ऑगस्ट) रोजी कुस्तीमध्ये सोनम मलिक आणि भारतीय हॉकी संघावर सर्वांच्या नजरा आहेत.
Tokyo Olympics 2021, 11th Day Schedule : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात दोन पदकं आली आहे. पहिलं मीराबाई चानूनं कमावलेलं रौप्यपदक, तर दुसरं स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कमावलेलं कांस्य पदक. आज मंगळवारी म्हणजेच, तीन ऑगस्ट रोजीही भारताच्या खात्यात आणखी काही पदकं येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंत यूएसनं सर्वाधिक 64 आणि चीननं 62 पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. जाणून घेऊया आजच्या टोकियो ऑलिम्पिकमधील अकरावा दिवस म्हणजेच, मंगळवारच्या भारतीय खेळाडूंच्या ऑलिम्पिकमधील शेड्यूलबाबत...
मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघ बेल्जियमच्या संघासोबत आपला उंपांत्य सामना खेळणार आहे. या सामन्यात पदकावर नाव कोरण्यासाठी काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. याव्यतिरिक्त अनु रानी, महिला भालाफेक क्वॉलीफिकेशन ग्रुप एमध्ये सकाळी 05.50 मिनिटांनी आणि तेजिंदरपाल सिंह तूर, पुरुष गोळाफेक क्वॉलिफिकेशन ग्रुप एमध्ये पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकण्यासाठी प्रयत्नशील असतील. एकूणच पाहता टोकियो ऑलिम्पिकमध्ये अकरावा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
अॅथलेटिक्स:
अनु राणी, महिला भालाफेक क्वॉलिफिकेशन ग्रुप ए, सकाळी 05.50 वाजता, तेजिंदरपाल सिंह तूर, पुरूष गोळाफेक क्वालिफिकेशन ग्रुप ए, सकाळी 03:45 वाजता
हॉकी :
भारत विरुद्ध बेल्जियम, पुरुष हॉकी सेमीफाइनल, सकाळी सात वाजता
कुस्ती :
सोनम मलिक विरुद्ध बोलोरतुया खुरेलखू (मंगोलिया), सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरु झाल्यानंतर सातवां बाउट.
डिस्कस थ्रोमध्ये भारताला निराशा, पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या कमलप्रीत कौरचं आव्हान संपुष्टात
काल (सोमवारी) देशाला कमलप्रीत कौरकडून अपेक्षा होत्या. परंतु, फायनल्समध्ये सहाव्या क्रमांकावर आली आणि पदक मिळवण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिलं. डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदक अमेरिकेच्या वॅलेरी ऑलमॅन (Valarie Allman)नं पटकावलं. तर रौप्यपदक जर्मनीच्या क्रिस्टिन पुडेन्ज़ो (Kristin Pudenz) नं आपल्या नावे केलं. कांस्य पदक क्यूबाच्या याइमे पेरेजच्या खात्यात जमा झालं.