Tokyo Olympics: आता अंगद बाजवा, भवानी आणि मनिका बत्रावर सर्वांच्या नजरा; 26 जुलैचं संपूर्ण वेळापत्रक पहा
सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंगद बाजवा, भवानी आणि मनिका बत्रा यांच्याकडून अपेक्षा आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.
Tokyo Olympics 2020 25th July Schedule: टोकियो ऑलिम्पिकचा तिसरा दिवसही भारताच्या अपेक्षेप्रमाणे गेला नाही. तिसर्या दिवशी स्टार महिला नेमबाज मनु भाकरला पराभवाला सामोरे जावे लागले. दिव्यांश आणि दीपक हेदेखील एअर रायफल स्पर्धेच्या पात्रता फेरीतून बाहेर पडले. मात्र, बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचा विजय झाला आणि मेरी कोमनेही तिचा सामना जिंकला. पण, भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावून चाहत्यांना निराश केले. आता चौथ्या दिवशी प्रत्येकाला अंगद बाजवा, भवानी आणि मनिका बत्रा यांच्याकडून आशा असतील. भारतीय वेळेनुसार सोमवारी (26 जुलै) टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक जाणून घेऊया.
टोकियो ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी सोमवारी भारताचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
धनुर्विद्या:
सकाळी 6 वाजता : भारत (प्रवीण जाधव, अतनू दास आणि तरुणदीप राय) विरुद्ध कझाकस्तान, पुरुष संघ 1/8 एलिमिनेशन
बॅडमिंटन:
सकाळी 09 : 10 वाजता सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध मार्कस गिडियोन फर्नाल्डी आणि केविन संजया सुकामुल्जो (इंडोनेशिया). पुरुष दुहेरी
बॉक्सिंग:
दुपारी 03:06 वाजता आशिष कुमार विरुद्ध एरबीके तुओहेता (चीन), पुरुष 75 किलो वजनी राऊंड 32 सामना
तलवारबाजी:
सकाळी 05:30 वाजता सी भवानी देवी विरुद्ध नादिया बेन अजिजि (ट्यूनीशिया), महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामना
हॉकी:
सायंकाळी 05:45 वाजता भारत विरुद्ध जर्मनी, महिलांचा पूल ए सामना, भारतीय समयानुसार शाम पांच बजकर 45 मिनट पर.
सेलिंग:
सकाळी 08:35 विष्णु सरवनन, पुरुष लेजर रेस, नेत्रा कुमानन, सकाळी 11:05 वाजता महिला लेजर रेडियल रेस
नेमबाजी:
सकाळी 06:30 वाजता मेराज अहमद खान आणि अंगद वीर सिंह बाजवा, पुरुष स्कीट स्पर्धा दुसरा दिवस
पुरुष स्कीट फायनल:
दुपारी 12:20 वाजता
पोहणे:
दुपारी 03:45 वाजता साजन प्रकाश : पुरुष 200 मीटर बटरफ्लाय हीट्स
टेबल टेनिस:
सकाळी 06:30 वाजता, अचंता शरत कम विरुद्ध टियागो अपोलोनिया (पोर्तुगाल), पुरुष एकेरी दुसरी फेरी,
दुपारी 12 वाजता, मनिका बत्रा विरुद्ध सोफिया पोलकानोवा (ऑस्ट्रिया), महिला एकेरी तिसरी फेरी
टेनिस:
सकाळी 07:30 वाजता सुमित नागल विरुद्ध दानिल मेदवेदेव (रशिया ऑलिम्पिकचा समिती), पुरुष एकेरीची दुसरी फेरी