एक्स्प्लोर

Paris Olympics : भारताच्या हॉकी संघाचं पुढचं पाऊल, आयरलँडवर 2-0 नं विजय, हरमनप्रीतची दमदार कामगिरी

Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस आशादायी ठरला आहे. मनू भाकरनं दुसरं कांस्यपदक जिंकल्यानंतर हॉकीमध्ये भारतानं आयरलँडला पराभूत केलं आहे.

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) चौथा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला आहे. नेमबाज मनू भाकर (Manu Bhaker)आणि सरबज्योत या दोघांनी मिश्र दुहेरी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. मनू भाकरनं एकाच ऑलिम्पिकमध्ये दुसरं पदक मिळवण्याचा इतिहास रचला. स्वतंत्र भारतात एकाच ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. या नंतर भारताला आणखी दोन गुड न्यूज पॅरिसमधून मिळाल्या. भारताच्या हॉकी (Indian Hockey Team) संघानं आयरलँडला 2-0 अशा फरकानं पराभूत केलं. भारताचा हा ऑलिम्पिकमधील तिसरा सामना होता. या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं (Harmanpreet Singh) दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. भारत हॉकीच्या ब गटात आहे. 

भारताच्या हॉकी संघाचं पुढचं पाऊल 

भारतीय हॉकी संघानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिकंलं होतं. यावेळी त्यांच्याकडून सुवर्ण किंवा रौप्य पदकाची आशा देशातील नागरिकांना आहे. त्या दिशेनं भारताच्या हॉकी संघाची वाटचाल सुरु आहे. भारतानं आज आयरलँडला 2-0 असं पराभूत केलं आहे. भारतानं सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व ठेवलं. आयरलँडला गोल करण्यापासून रोखण्यात भारतीय संघाला यश आलं.  अखेर भारतानं आयरलँडला2-0  अशा फरकानं पराभूत करत विजय मिळवला.  भारतानं आयरलँड विरुद्ध एक गोल पेनल्टी स्ट्रोक आणि पेनल्टी कॉर्नरवर केला. भारताकडून दोन्ही गोल हरमनप्रीत सिंगनं केले. 

भारत हॉकीमध्ये ब गटात पहिल्या स्थानावर 

भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन सामने जिंकले आहेत. तर, एक सामना बरोबरीत सोडवण्यात संघाला यश आलं आहे. भारतानं पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडला 3-2 असं पराभूत केलं होतं. त्यानंतर काल अर्जेंटिना विरुद्ध भारतीय संघ पराभावच्या छायेत होता. मात्र, कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं 58 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली.  तर, आज झालेल्या मॅचमध्ये भारतानं आयरलँडला 2-0 असं पराभूत केलं. या विजयासह भारतीय हॉकी संघ 7  गुणांसह ब गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. अर्जेंटिनानं न्यूजीलँडला पराभूत केल्यास भारताचं उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित होईल. 

चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज उपांत्यपूर्व फेरीत 

भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेड्डी यांनी देखील इंडोनेशियाच्या संघाला पराभूत केलं आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रेड्डी यांनी 21-13 आणि 21-13  अशा फरकानं इंडोनेशियाच्या खेळाडूंना पराभूत केलं.  दरम्यान, मनू भाकरनं भारताला दोन कांस्य पदक जिंकवून दिल्यानंतर अजून एक पदक ती जिंकवून देऊ शकते. 2  ऑगस्ट रोजी ती 25  मीटर एअर पिस्टल शुटिंगमध्ये सहभागी होईल. 

संबंधित बातम्या : 

भारताच्या लेकीने मनं जिंकली; एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली, मनू भाकर पहिली खेळाडू ठरली!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Devendra Fadnavis-Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
मोठी बातमी: मुंबईच्या महापौरपदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा?; पडद्यामागे नेमकं काय काय घडतंय?
Mumbai News: 7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
7.65 रुपयांच्या चोरीचा खटला, तब्बल 50 वर्षांनी लागला निकाल; न्यायालयाने कोणते दिले आदेश?
Nashik Accident News: मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स अन् पिकअपचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी
Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Tanaji Sawant: शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले...
शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या खिशात, तानाजी सावंत यांचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाले...
Embed widget