एक्स्प्लोर

Rohan Bopanna: भारतीय टेनिसचा 'आयरन मॅन' निवृत्त, रोहन बोपन्नाकडून 22 वर्षांच्या करिअरला पूर्णविराम

Rohan Bopanna Retirement: भारताचा टेनिस स्टार रोहन बोपन्नानं पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 च्या पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे.

पॅरिस : भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नानं (Rohan Bopanna Retirement ) निवृत्ती जाहीर केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) अपयश आल्यानंतर बोपन्नानं हा निर्णय घेतला. भारताकडून टेनिसमध्ये रोहन बोपन्ना आणि एन श्रीराम बालाजी यांनी सहभाग घेतला होता. या दोघांच्या जोडीला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. रोहन बोपन्ना आणि एन श्रीराम बालाजी यांना 7-5, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. रोहन बोपन्ना यानं त्या सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. बोपन्नानं भारतासाठी जवळपास 22 वर्ष 
टेनिस खेळलं.  

रोहन बोपन्नानं निवृत्ती जाहीर करताना म्हटलं की ही माझ्या टेनिस करिअरची अखेरची स्पर्धा होती. एक खेळाडू म्हणून मी कुठं पोहोचलो आहे, हे मला माहिती आहे. मी जे आतापर्यंत केलं ते माझ्यासाठी एका यशाप्रमाणं आहे.भारताचं प्रतिनिधीत्व 20 वर्षांपेक्षा अधिक काळ करेन, असं वाटलं नव्हतं. 2002 मध्ये पदार्पण आणि 22 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर निवृत्ती घेत आहे. मला या ऐतिहासिक कारकिर्दीवर गर्व आहे, असं रोहन बोपन्ना म्हणाले. 

आशियाई गेम्समधूनही माघार

रोहन बोपन्ना यांनी ऑलिम्पिक सुरु असतानाच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळं 2026  मध्ये होणाऱ्या आशियाई गेम्स मध्ये देखील ते खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्जा यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना पदक जिंकता आलं नव्हतं. यावेळ एन. श्रीराम बालाजी याच्यासोबत पदक जिंकण्याची संधी होती. मात्र, फ्रान्सच्या गेल  मोनफिल्स आणि रॉजर वेसेलिन यांच्या जोडीनं त्यांना पराभूत केलं.  

रोहन बोपन्ना यांनी त्यांच्या ऐतिहासिक टेनिस करिअरमध्ये 6 वेळा दुहेरी स्पर्धेत ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यापैकी 2 वेळा ग्रँड स्लॅमचं विजेतेपद मिळालं. 2017 मध्ये कॅनडाच्या गेब्रियला डैब्रोवस्की यांच्यासोबत मिश्र दुहेरीचं फ्रेंच ओपनचं विजेतेपद बोपन्ना यांनी मिळवलं. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅत्यू एब्डन सोबत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा देखील त्यांनी जिंकली होती.

संबंधित बातम्या :

Paris Olympic 2024: तीन वेळा अपयश, अखेर कर्णधार हरमनप्रीतची तिरकी चाल अन् भारतानं अर्जेंटिनाचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget