Paris Olympics 2024: मनू भाकरनं इतिहास रचला, 20 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला नेमबाज अंतिम फेरीत
Manu Bhaker: भारताच्या मनू भाकर 10 मीटर एअर पिस्टल मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान 15 व्या स्थानावर राहिली.
पॅरिस : भारतासाठी (Team India) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics)आजचा दिवस संमिश्र राहिला आहे. भारताच्या पुरुष तिरंदाजांनी रँकिंग राऊंडमध्ये टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं. भारतासाठी दुसरी चांगली बातमी समोर आली ती म्हणजे 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत मनू भाकरनं (Manu Bhakar) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.तर, याच स्पर्धेत सहभाग घेणारी दुसरी स्पर्धक रिदिमा सांगवान 15 व्या स्थानावर राहिली.
तब्बल 20 वर्षानंतर महिला भारतीय नेमबाज अंतिम फेरीत
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारताला पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मनू भाकरनं तिसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान हिनं देखील चांगली कामगिरी करण्याची प्रयत्न केला. मनू भाकरच्या यशामुळं तब्बल 20 वर्षानंतर भारताची महिला नेमबाज अंतिम फेरीत पोहोचली आहे. 2004 मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज सुमा शिरुर 10 मीटर एअर पिस्टल महिला गटात अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नव्हतं.
मनू भाकरकडून पदकाची आशा
मनू भाकर ने पात्रता फेरीत 580-27x एवढा स्कोअर केला. रिदिमा सांगवान हिनं 573-14x एवढा स्कोअर केला. उद्या दुपारी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता 10 मीटर एअर पिस्टलची अंतिम फेरी होणार आहे. भारताच्या चाहत्यांना मनू भाकरकडून सुवर्णपदकाची आशा असेल. अंतिम फेरीत 8 नेमबाज सहभागी असतील.
अंतिम फेरीची लढत उद्या होणार असून मनू भाकर पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर आहे. हंगेरीची वेरोनिका मेजर 582-22x पहिल्या स्थानावर होती. दक्षिण कोरियाची की जिन ये ही 582-20X सह दुसऱ्या स्थानावर राहिली. भारताच्या मनू भाकरनं 97,97,98,96,96 आणि 96 असा स्कोअर केला. अंतिम फेरीत या तिघांसह व्हिएतनामची विन्ह थू त्रिन, दक्षिण कोरियाची येजी किम, चीनची जुए ली, तूर्कीची इलायदा सेवाल तरहान आणि चीनची रेंक्सिन जियांग अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत.
🇮🇳 𝗗𝗿𝗲𝗮𝗺 𝘀𝘁𝗮𝗿𝘁 𝗳𝗼𝗿 𝗠𝗮𝗻𝘂 𝗕𝗵𝗮𝗸𝗲𝗿! A terrific performance from Manu Bhaker as she finishes 3rd with a total score of 580 to advance to the final in the women's 10m Air Pistol event. After initial disappointment earlier in the day, we finally have some good… pic.twitter.com/QhdEO8XNPH
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 27, 2024
संबंधित बातम्या :