एक्स्प्लोर

Paris Olympics 2024: भारताचं पहिलं पदक निश्चित, तिरंदाजीत मराठमोळ्या खेळाडूसह तिघांची दमदार कामगिरी, मोठी अडचण दूर, कारण... 

Archery Paris Olympics 2024: भारताला तिरंदाजीत एक पदक मिळणार हे निश्चित आहे. तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये भारतीय संघानं टॉप-4 मध्ये स्थान मिळवलं आहे.  

Archery Paris Olympics 2024 पॅरिस : भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमधील सुरुवात तिरंदाजीतील सहभागानं मोहीम सुरु केली आहे. तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघानं टॉप 4  मध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. महिला आणि पुरुष संघांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवल्यानं देशातील नागरिकांच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.   पुरुष संघाची पदक मिळवण्याची शक्यता जास्त आहे कारण तिरंदाजीतील पहिल्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या संघासोबत भारताचा सामना होणार नाही.  

धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी 2013 गुण मिळत तिसऱ्या स्थानी झेप घेतला.भारताला तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात निश्चित करण्यात आलं आहे. भारताचा सामना तुर्की आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे. तुर्कीच्या संघानं 6 व्या तर कोलंबियानं 11 व्या स्थान मिळवलं होतं.12 व्या स्थानावर असलेल्या संघाला उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी एका सामन्यात विजय मिळवत टॉप 8 मध्ये स्थान मिळवावं लागतं. 

भारताचं पदक निश्चित

भारताच्या संघाला पदक मिळू शकतं असं बोललं जातंय कारण अंतिम फेरीच्या लढतीपर्यंत भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार नाही. 
भारतानं उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवल्यास त्यांचा सामना फ्रान्स, इटली किंवा कझाकिस्तान यांच्या विरुद्ध होईल. विशेष बाब म्हणजे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं  दक्षिण कोरियाला पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं होतं.  

तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकासाठी मॅच 29 जुलै रोजी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक तिरंदाजीमध्ये मिळू शकतं. दुसरीकडे महिला तिरंदाजीमध्ये भारताला पदक मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. दक्षिण कोरिया रँकिंग राऊडमध्ये पहिल्या स्थानावर आहे. उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवल्यास भारताचा उपांत्य फेरीत सामना बलाढ्य दक्षिण कोरियासोबत होणार आहे.  भारताच्या महिला टीमनं तिरंदाजीत दमदार कामगिरी केली होती.  दीपिका कुमारी (Deepika Kumari), अंकिता भकत आणि भजन कौर यांनी भारताला 1983 अंक मिळवून दिले. 

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हॉकी सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार नऊ वाजता सुरु होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Olympics 2024: भारताच्या लेकींची उपांत्यपूर्व फेरीत धडक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत दमदार कामगिरी 

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं वेळापत्रक, 117 खेळाडू पदक जिंकण्यासाठी लढणार, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
Embed widget