Paralympics 2024 Sachin Khilari Silver : आटपाडीच्या पठ्ठ्याने इतिहास रचला, सचिन खिलारीला पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक
Paralympics 2024 Sachin Khilari News : सांगलीच्या सचिन खिलारीने रचला इतिहास!
Sachin Khilari Wins Silver : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातल्या सचिन खिलारीने इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. हे आजचे पहिले पदक आहे. या रौप्य पदकासह सचिन 40 वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.
Congratulations to Sachin Khilari for his incredible achievement at the #Paralympics2024! In a remarkable display of strength and determination, he has won a Silver medal in the Men’s Shotput F46 event. India is proud of him. #Cheer4Bharat pic.twitter.com/JNteBI7yeO
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2024
सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या 21 झाली आहे. सचिनने 16.32 मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविचला मिळाले. सचिनने यापूर्वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.
🇮🇳🥈 𝗪𝗛𝗔𝗧 𝗔 𝗠𝗢𝗠𝗘𝗡𝗧! Sachin Khilari strikes silver in the Men’s Shot Put - F46 event at the Paris Paralympics 2024, claiming India's 21st medal!
— The Bharat Army (@thebharatarmy) September 4, 2024
🔥 With an incredible throw of 16.32 meters, he becomes the first Indian male shot putter in 30 years to win a Paralympic… pic.twitter.com/GiSh3RzDl4
आशियाई विक्रम मोडून जिंकले पदक
34 वर्षीय खेळाडूने दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि 16.30 मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे 2024 मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा विक्रम केला. खिलारीचे रौप्यपदक हे सध्या सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये पॅरा-ॲथलेटिक्समध्ये जिंकलेले 21 वे पदक आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातात हालचाल कमी आहे.
Sachin Khilari soars to new heights with a Silver Medal in the Men's Shot Put F46 at the #Paralympics2024!
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 4, 2024
Your relentless pursuit of greatness has earned you a place on the podium & in our hearts. Well done!#Cheer4Bharat pic.twitter.com/v6v0rXGONl
शॉटपुटमध्ये तिसरे पदक
पॅरालिम्पिकच्या इतिहासात शॉटपुटमध्ये पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 1984 मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता हे तिसरे पदक 8 वर्षांनंतर आले आहे.