(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hockey, India Enters Semi-Finals: पुरुष हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, चार दशकांनंतर ब्रिटनला हरवून गाठली उपांत्य फेरी
भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी 1972 मध्ये पुरुष हॉकी संघाने ही कामगिरी केली होती.
Hockey, India Enters Semi-Finals: टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. ग्रेट ब्रिटनला 3-1 हरवून टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली. भारतीय पुरुष हॉकी संघाने चार दशकांनंतर ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी 1972 मध्ये पुरुष हॉकी संघाने ही कामगिरी केली होती.
टोकियो ऑलिम्पिकचा आजचा 10 वा दिवस भारतासाठी खास आहे. भारताने आज आपल्या खात्यात दुसरं पदक जोडली आहेत. स्टार शटलर पीव्ही सिंधूने कांस्यपदक पटकावले. त्याने चीनच्या बिंग जियाओचा पराभव करून तिने ही कामगिरी केली. भारताच्या खात्यात आता दोन पदके आहेत. बॉक्सिंगमध्येही पदक निश्चित झालं आहे. महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेनने उपांत्य फेरी गाठली आहे.
रविवारी ओई हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ग्रेट ब्रिटनचा 3-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. भारतासाठी दिलप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला, गुरजंत सिंगने 16 व्या आणि हार्दिक सिंहने 57 व्या मिनिटाला गोल केले. सॅम्युएल वार्डने 45 व्या मिनिटाला ब्रिटनसाठी एकमेव गोल केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना विश्वविजेत्या बेल्जियमशी होईल. बेल्जियमने तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनचा 3-1 असा पराभव केला.
ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी दुसऱ्या उपांत्य सामन्यात भिडतील. जर्मनीने दिवसाच्या सुरुवातीच्या सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचा 3-1 असा पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने पेनल्टी शूटआऊटनंतर नेदरलँडचा 3-0 असा पराभव केला.