एक्स्प्लोर

Lovlina Borgohain : बॉक्सर लवलीनाला आसाम सरकारचं अनोखं गिफ्ट, घरापर्यंत बनवला पक्का रस्ता 

बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला असून आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तिच्या या कामगिरीनंतर आसाम सरकारनं तिला एक अनोखं गिफ्ट दिलं आहे.

गुवाहाटी: Tokyo Olympics 2020 LIVE :  महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तिच्या या कामगिरीनंतर आसाम सरकारनं तिला एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. तिच्या घरापर्यंत जाणारा पक्का रस्ता सरकारकडून तयार करण्यात आला आहे.  स्थानिक आमदार बिस्वजीत फूकन यांनी लवलीनाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता बनवून घेतला आहे. 

Lovlina Borgohain: लवलीनाचा मोठा संघर्ष! आसाममधल्या छोट्याशा गावातून सुरु झालेला प्रवास ऑलिम्पिक पदकापर्यंत... 

लवलीनाचे वडील टिकेन यांनी सांगितलं की, आता तिनं पदक जिंकलं आहे. तर सरकारनं रस्ता बनवला आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, कारण हा रस्ता म्हणजे लवलीना आणि आमच्या गावासाठी एक पुरस्कारच आहे.  

Tokyo Olympics 2020 LIVE : महिला बॉक्सिंगमध्ये लवलिनाची जबरदस्त कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजय, भारताचं आणखी एक पदक निश्चित

माजी विश्वचॅम्पियनला नमवत पदकावर शिक्कामोर्तब

क्वार्टर फायनल सामन्यात भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेन ला  4-1 अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं. याआधी लवलीनानं  जर्मनीच्या अनुभवी Nadine Apetz ला पराभूत केलं होतं. आता लवलीनानं आपलं पदक निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे. 69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

Tokyo Olympics 2020: लवलीनानं रचला इतिहास, सेमीफायनलमध्ये एन्ट्री, महिला बॉक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित

आसामच्या छोट्या खेड्यातून सुरु झाला प्रवास
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील  बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना या भागात खूप लोकप्रिय आहे.  लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. 

माईक टायसन, मोहम्मद अली आवडते 
लवलीनाला माइक टायसनची स्टाईल आवडते तर  मोहम्मद अली देखील तेवढेच आवडतात. मात्र आता तिनं या दोघांप्रमाणेच आपली वेगळी ओळख बनवली आहे. 2018 मध्ये लवलीनानं दिल्लीत आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर रशियात आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये  लवलीनानं पुन्हा कांस्यपदक जिंकलं होतं.  

लवलीनाच्या दोन बहिणीही बॉक्सिंगमध्ये

लवलीना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलीनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलीनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी  लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलीनाही किकबॉक्सिंगमध्ये आली. 

ऑलिम्पिकच्या आधीच आईची झाली सर्जरी  
ऑलिम्पिकच्या आधीचे काही दिवस लवलीनासाठी खूप कठिण होते. ऑलिम्पिकआधी सर्व खेळाडू ट्रेनिंगमध्ये असताना लवनीना मात्र बॉक्सिंगपासून दूर होती.  लवलीनाच्या आईची कीडनी ट्रान्सप्लांट सर्जरी या काळात झाली. ही सर्जरी झाल्यानंतर लवलीना ट्रेनिंगसाठी परतली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
Embed widget