Bajrang Punia Father Passes Away : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर! वडिलांचे निधन, अत्यंत भावनिक पोस्ट लिहित म्हणाला, 'आता कोणाकडे पाहू...'
Olympic Medalist Bajrang Punia Father Death : ओलंपिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पूनिया यांचे वडील बलवान पूनिया यांचे निधन झाले आहे.

Bajrang Punia Father Balwan Punia Passed Away : ओलंपिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पूनिया यांचे वडील बलवान पूनिया यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला होता आणि गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बलवान पूनिया स्वतःही कुस्तीपटू होते. लहानपणीच त्यांनी बजरंगला कुस्तीच्या मैदानात उतरवले आणि त्याला या खेळाच्या बारकाव्यांचे धडे दिले. बजरंगने टोकियो ऑलंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकले होते.
बजरंगची भावनिक पोस्ट
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बजरंगने वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्याने लिहिले की, "बापूजी आता आपल्यात नाहीत. आज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खूप मेहनत करून त्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवले. ते आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आधारस्तंभ होते. आता कोणाकडे पाहू तुमच्या शिवाय पुढचा प्रवास कसा असेल, हे समजत नाही. उद्या सकाळी 11 वाजता आमच्या खुडन गावात त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत."
बापूजी हमारे साथ नहीं रहे. आज शाम सवा छह बजे उन्होंने आख़िरी सांस ली.
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) September 11, 2025
उन्होंने बड़ी मेहनत से हम लोगों को यहाँ तक पहुंचाया था. वे हमारे पूरे परिवार की रीढ़ थे. समझ नहीं आ रहा कि उनके बिना आगे जीवन कैसा होगा.
उनका अंतिम संस्कार हमारे गाँव खुडन में सुबह 11 बजे किया जाएगा.
बजरंग… pic.twitter.com/h0omVp8SGa
बजरंग पुनिया गेल्या काही वर्षांत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने आपल्या सहकारी कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगटसोबत मिळून कुस्ती आंदोलनाची सुरुवात केली होती. कुस्ती संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात बजरंग याने दीर्घकाळ धरना आंदोलन केले. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतर ते पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरू शकले नाहीत.
7 सप्टेंबर 2024 रोजी, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजरंग पुनिया यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आपल्या सहकारी विनेश फोगटसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच त्यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती.
हे ही वाचा -
























