एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराटला 'सॉरी'ची स्पेलिंगही येत नसेल : जेम्स सदरलँड
मुंबई : क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. कोहलीला सॉरी म्हणता येत नाही, एवढचं नव्हे तर त्याला सॉरीची स्पेलिंगही माहित नसेल, असं वक्तव्य सदरलँड यांनी एका रेडिओ स्टेशनशी बोलताना केलं.
धर्मशाळा इथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडिया टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हात धुवून मागे लागल्याचं चित्र आहे. यामध्ये आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलँड यांनीही उडी घेतली आहे.
बंगळुरु कसोटीत विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर डीआरएसप्रकरणी जाहीर टीका केली होती. त्यानंतर विराटने स्मिथची माफी मागावी, अशी मागणी सदरलँड यांनी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी या मुद्द्यावरुन विराटवर निशाणा साधला आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियाचा विराटवर निशाणा
ऑस्ट्रेलियन मीडियाकडून सतत विराटला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटची तुलना नुकतीच ‘क्रीडा जगतातील ट्रम्प’ अशी केली होती. त्यानंतर विराटच्या समर्थनार्थ बिग बी अमिताभ बच्चन आणि सुनील गावसकरही मैदानात उतरले होते.
ऑस्ट्रेलियन मीडिया हा ऑस्ट्रेलिया संघाचा सपोर्टिंग स्टाफ आहे, असं सुनील गावसकर म्हणाले होते.
बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ऑस्ट्रेलियन मीडियाला प्रत्युत्तर दिलं होतं. ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटला खेळातील ट्रम्प म्हटलं आहे. त्याबद्दल आभार, विराट विजेता आहे आणि राष्ट्रपतीही, हे ऑस्ट्रेलियाने स्वीकारलं आहे, असं खणखणीत उत्तर बिग बींनी दिलं होतं.
काय आहे डीआरएस वाद?
बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं, त्या वेळी स्मिथने डीआरएसचा कौल मागण्यासाठी ड्रेसिंग रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांकडे सहाय्याची अपेक्षा केली होती.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याविरोधात पंचाकंडे तक्रार केली. त्यामुळे उभय कर्णधारांमध्ये वादाची ठिणगी पडली. बंगळुरू कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने स्मिथच्या त्या कृतीवर जाहीर टीका केली.
संबंधित बातम्या :
कर्णधार स्मिथचा खोटेपणा, डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडे इशारा!
डीआरएस वाद , बीसीसीआय-क्रिकेट ऑस्ट्रेलियात वादाची ठिणगी
ऑस्ट्रेलियन मीडियाकडून विराट कोहलीची डोनाल्ड ट्रम्प यांच्यांशी तुलना
कोहली वि. ऑस्ट्रेलियन मीडिया : विराटच्या समर्थनार्थ बिग बी मैदानात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement