National Games 2022: महिलांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये नेमबाज एलावेनिल वालारिवनचा सुवर्णवेध
गुजरातच्या (Gujarat) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरु असलेल्या राष्ट्रीय गेम्स स्पर्धेत एलावेनिल वालारिवनची (Elavenil Valarivan) चमक पाहायला मिळाली.
National Games 2022: गुजरातच्या (Gujarat) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत एलावेनिल वालारिवनची (Elavenil Valarivan) चमक पाहायला मिळाली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत एलावेनिल वालारिवननं तिलोत्तमा सेनचा 16-10 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलंय.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (29 सप्टेंबर) झालं. गुजरातमधील मोटेरा इथल्या जागतिक दर्जाच्या स्टेडियमवर हा शानदार सोहळा झाला. तेरा दिवसांच्या या स्पर्धेत खेळाडू आपलं कौशल्य दाखवणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धा 2015 नंतर प्रथमच होत आहेत. विविध कारणांनी ही स्पर्धा पुढं ढकलण्यात आली होती. गोव्यात होणारी ही स्पर्धा आता गुजरातमध्ये सुरु आहे.
ट्वीट-
Medalists🏅 of 10m Air Rifle (Women's)
— SAI Media (@Media_SAI) September 30, 2022
🥇Elavenil Valarivan
🥈Mehuli Ghosh
🥉Tilottama
Many congratulations Champs!!#36thNationalGames #NationalGames2022@elavalarivan @GhoshMehuli pic.twitter.com/Wzin5RISce
मीराबाईनंही जिंकलं सुवर्णपदक
मीराबाई हिने नॅशनल गेम्समध्ये महिलांच्य़ा 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं आहे. मीराबाईने एकूण 191 किलो वजन उचलत ही कमाल केली आहे. यावेळी तिने स्नॅच राऊंडमध्ये 84 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 107 किलो वजन उचललं. विशेष म्हणजे तिने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केल्याने क्लिन अँड जर्कमध्ये तिला तिसरा अटेम्प्ट करावा लागला नाही. ती आधीच आघाडीवर असल्याने तिने सुवर्णपदक जिंकलं आहे. यावेळी संजिताने रौप्यपदक तर ओडिशाच्या स्नेहा सोरेनने कांस्य पदक मिळवलं.
कोणकोणत्या शहरात रंगणार राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा?
गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये हे खेळ होणार आहेत. मात्र, ट्रॅक सायकलिंगचा कार्यक्रम दिल्लीतील वेलोड्रोम येथे होणार आहे.
नॅशनल गेम्समध्ये कोणकोणत्या खेळांचा समावेश
28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 7000 खेळाडू तसेच भारतीय सशस्त्र दलातील क्रीडा संघही राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. एकूण 36 क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत. ज्यात एक्वाटिक्स, भारतीय तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बीच स्पोर्ट्स, बॉक्सिंग, कॅनोइंग, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, लॉन बॉल, मल्लखांब, नेटबॉल, रोलर स्पोर्ट्स, रोइंग, रग्बी 7s, शूटिंग, सॉफ्ट टेनिस, सॉफ्टबॉल, स्क्वॅश, टेबल टेनिस, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू आणि योग यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा-