Legends League Cricket: भीलवाडा किंग्जसमोर गुजरात जायंट्सचं आव्हान, कधी, कुठं पाहणार सामना?
Legends League Cricket : लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये माजी दिग्गज खेळाडू रंगतदार खेळी करताना दिसत असून आज गुजरात जायंट्स विरुद्ध भीलवाडा किंग्ज सामना रंगणार आहे.
Legends League Cricket : लीजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या हंगामातील (Legends League Cricket Season 2) आजचा 11 वा सामना गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्ज (Gujrat Giants vs Bhilwara Kings) यांच्यात खेळवला जाणार आहे. हंगामात आतापर्यंत दोन्ही संघानी आपल्या पाच सामन्यांतील दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. तसंच एक सामना अनिर्णीत राहिला आहे. अशामध्ये आजचा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत चांगली प्रगती करु शकतो.
आज सामना पार पडणाऱ्या दोन्ही संघामध्ये क्रिकेट जगतातील बरेच माजी दिग्गज खेळाडू आहेत. यावेळी गुजरात संघाचं नेतृत्त्व वीरेंद्र सेहवागकडे तर भीलवाडा किंग्सचा कर्णधार भारताचा माजी स्टार अष्टपैलू इरफान पठाण असणार आहे. आजचा सामना होणाऱ्या दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडू असल्याने आपले आवडते क्रिकेटर पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळतील, तर आज नेमके कोणते खेळाडू मैदानात उतरु शकतात, यासाठी दोन्ही संघाचे संभाव्य अंतिम 11 पाहूया...
अशी असू शकते अंतिम 11
गुजरात जायंट्सचे संभाव्य अंतिम 11 - वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), पार्थिव पटेल (विकेटकीपर), केविन ओ ब्रायन, तिलकरत्ने दिलशान, लेंड्ल सिमन्स, थिसारा परेरा, रियाद एमरिट, ग्रीम स्वान, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लेघन आणि अशोक डिंडा.
भीलवाडा किंग्सचे संभाव्य अंतिम 11 - मोर्ने वॅन विक, विलियम पोटरफिल्ड, इरफान पठाण (कर्णधार), जेसल करिया, युसूफ पठाण, राजेश बिश्नोई, मयंक तेहलान, तन्मय श्रीवास्तव, श्रीसंत, टिनो बेस्ट, फिदेल एडवर्ड्स. मॉन्टी पानेसर, दिनेश साळुंके
कधी, कुठं पाहणार सामने?
लीजेंड्स लीग क्रिकेटचा आजचा सामना (30 सप्टेंबर) जोधपुरच्या बरकतउल्लाह खान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. यापू्र्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सिनेप्लेक्स आणि स्पोर्ट्स-18 वाहिनीवर केलं जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट अॅपवर पाहता येणार आहे.
हे देखील वाचा-