एक्स्प्लोर
सेरेनावर मात, जपानची नाओमी ओसाका यूएस ओपनची विजेती
ग्रँड स्लॅम एकेरीचं विजेतेपद मिळवणारी 20 वर्षांची नाओमी ओसाका ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे.

न्यूयॉर्क : जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचा पराभव करुन यूएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरलं. नाओमीने कारकीर्दीतील पहिलं ग्रँड स्लॅम टायटल पटकावलं.
नाओमीने 6-2, 6-4 अशा सेट्समध्ये सेरेनाला हरवलं. ग्रँड स्लॅम एकेरीचं विजेतेपद मिळवणारी 20 वर्षांची नाओमी ओसाका ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्याच मार्गारेट कीची झुंज मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
सेरेनाच्या कारकीर्दीतली ही अमेरिकन ओपनमधील नववी आणि ग्रँड स्लॅममधली 31 वी फायनल होती. विशेष म्हणजे सेरेनाने बाळंतपणानंतर वर्षभरातच गाठलेली ही केवळ दुसरी ग्रँड स्लॅम फायनल होती. मात्र नाओमीने सेरेनाच्या विजेतेपदाचं स्वप्न भंग केलं. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सेरेनाला यावेळी साधता आली नाही.
सेरेना आणि नाओमी यांच्या वयामध्ये तब्बल 16 वर्षांचं अंतर आहे. सेरेनाने आपल्या कारकीर्दीतलं पहिलं यूएस ओपन जेतेपद पटकावलं, त्यावेळी म्हणजे 1999 साली नाओमी अवघ्या एक वर्षाची होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
