![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या विद्यार्थ्यांची 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी, 5 सुवर्णपदकांसह 14 पदकांवर कोरलं नाव
Acrobatics : मुंबईच्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्र येथील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेत सराव करणार्या खेळाडूंनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
![मुंबईच्या विद्यार्थ्यांची 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी, 5 सुवर्णपदकांसह 14 पदकांवर कोरलं नाव Mumbai students shine in 12th Asian Acrobatics Championships bags 14 medals including 5 golds मुंबईच्या विद्यार्थ्यांची 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी, 5 सुवर्णपदकांसह 14 पदकांवर कोरलं नाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/01/5850c325c5ea820ee1526edd2f7b10361664614448528323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asian Acrobatics Championships : भारतीय खेळाडू मागील काही वर्षात क्रिकेट, हॉकी अशा निवडक खेळांशिवाय सर्वच प्रकारच्या खेळांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यावर नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. विविध खेळांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंनी नुकत्याच काझाकिस्तान येथे झालेल्या 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (12th Asian Acrobatics Championships) 5 सुवर्णपदकांसह 14 पदकांवर नाव कोरलं आहे.
मुंबईच्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्र येथील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेत सराव करणार्या खेळाडूंनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. काझाकिस्तान येथे झालेल्या 12व्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करीत या खेळाडूंनी 5 सुवर्णपदकं, 2 रौप्यपदकं आणि 7 कांस्यपदकं खिशात घातली आहेत. यावेळी ज्युनियर गटात महिला तिहेरीत अर्णा पाटील, आचल गुरव आणि निक्षिता खिल्लारे यांनी 3 कांस्य पदकं तर सिनियर गटात महिला दुहेरीमध्ये ऋतुजा जगदाळे आणि प्रिती एखंडे यांनी 2 सुवर्ण पदक मिळवली आहेत.
दुसरीकडे पुरुष दुहेरीत आकाश गोसावी आणि आदित्य खसासे यांनी 2 रौप्य पदकं तर महिला तिहेरीत अक्षता ढोकळे, रितिका महावर आणि सोनाली बोराडे यांनी 3 सुवर्ण पदकं मिळवली आहेत. तसंच पुरुष संघात नमन महावर, प्रशांत गोरे, कुणाल कोठेकर आणि रितेश बोराडे यांनी 4 कांस्य पदकं अशी एकूण 14 पदकांची कमाई केली आहे. या खेळाडूंना शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते आंतराष्ट्रीय प्रशिक्षक राहुल ससाणे, शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू आंतराष्ट्रीय पंच योगेश पवार, राष्ट्रीय पंच सुनील रणपिसे, रमेश सकट यांनी मार्गदर्शन केले होते.
काय आहे ॲक्रोबॅटिक्स?
ॲक्रोबॅटिक्स हा जिम्नॅस्टीक्स (Gymnastics) या खेळाचा उपप्रकार आहे. या खेळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धा तसंच विश्वचषक स्पर्धा आयोजित केल्या जातात. या खेळात आतापर्यंत रशीयन देशांचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदा काझाकिस्तान येथे आयोजित 12व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत काझाकिस्तान, उझबेकिस्तान,भारत, हाँक काँग, तुर्कमेनिस्तान, इराण, किर्गिस्तान या देशांनी सहभाग घेतला होता.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)