(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pro Kabaddi League: आज मुंबई आणि यूपी यांच्यात लढत, ड्रीम 11 च्या टीप्स आणि कोणत्या संघाचं पारडं जड? वाचा
Pro Kabaddi League: बेंगळुरूमधील शेरेटन ग्रँड व्हाइटफील्ड येथे आजचा सामना पार पडणार आहे.
Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या 25 व्या सामन्यात मुंबईचा संघ (U Mumba) आज यूपी (UP Yoddha) भिडणार आहे. बेंगळुरूमधील शेरेटन ग्रँड व्हाइटफील्ड येथे आजचा सामना पार पडणार आहे. दरम्यान, मुंबईचा संघ 14 गुणांसह प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, यूपीनं आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकलाय. दहा गुणांसह यूपीच्या संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. आजचा सामना प्रेक्षकांसाठी रोमहर्षक ठरण्याची शक्यता आहे.
प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील पाचव्या सामन्यात यूपी आणि मुंबईचा संघ आमने- सामने येणार आहेत. कबड्डीच्या इतिहासात दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत राहिलाय. दोन्ही संघ सहा सामन्यांमध्ये आमने- सामने आले होते. यातील तीन सामने यूपीनं तर, तीन मुंबईनं जिंकले आहेत. या सामन्यात परदीप नरवालकडून चांगल्या खेळीची अपेक्षा कायम आहे. त्यानं चार सामन्यात 34 रेड पॉईंट्स मिळवले आहेत. या सामन्यात परदीप नरवालनं चांगली कामगिरी केल्यास यूपीच्या संघाला मोठा फायदा होऊ शकतो.
मुंबईची चमकदार कामगिरी
अजित कुमार आणि अभिषेक सिंह मुंबईचे मुख्य रेडर ठरले आहेत. या हंगामात मुंबईच्या संघाकडून खेळताना अजित कुमारनं 39 आणि अभिषेकनं 36 पॉईंट्स मिळवले आहेत. दोघांनीही त्यांच्या शेवटच्या सामन्यात जयपूर विरुद्ध सुपर 10 पूर्ण केला होता. शेवटच्या सामन्यात फजल अत्राचली फॉर्ममध्ये परतल्यानं योद्धांची चिंता वाढलीय. पीकेएलच्या आठव्या हंगामात चांगले सर्वोकृष्ट बचावपटू मिळाले आहेत.
संभाव्य ड्रीम 11 संघ
1) अजित कुमार
2) अभिषेक सिंह
3) आशु सिंह
4) फजल अत्राचली
5) परदीप नरवाल
6) सुरेंदर गिल
7) सुमित कुमार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Pro Kabaddi League 2021 : यू मुंबा विरुद्ध तामिळ थलायवाजमधील सामना अनिर्णीत, तर पिंक पँथर्सचा युपी योद्धांवर विजय
- Pro Kabaddi League 2021 : दबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स सामना बरोबरीत, तर बंगळुरू बुल्सचा बंगाल वॉरियर्सवर विजय
- Pro Kabaddi League 2021 : अटीतटीच्या सामन्यात पुणेरी पलटणचा तेलुगू टायटन्सवर; तर पिंक पँथरचा हरयाणा स्टीलर्सवर विजय