एक्स्प्लोर
मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला साक्षी धोनीच्या खास शुभेच्छा
साक्षीने आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या एका सामन्यानंतरचा फोटो पोस्ट केला.
मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. शार्दुलसोबत फोटो पोस्ट करत साक्षीने त्याला इन्स्टाग्रामवरुन बर्थडे विश केलं. मराठमोळा शार्दुल ठाकूर मूळ पालघरचा रहिवासी आहे.
शार्दुलचा काल (16 ऑक्टोबर) 27 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त साक्षीने आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या एका सामन्यानंतरचा फोटो पोस्ट केला. आयपीएलच्या 12 व्या पर्वात धोनीच्या नेतृत्वात विजयी झालेल्या चेन्नई संघात शार्दुलचा समावेश होता. त्यामुळे साक्षी आणि शार्दुल यांची मैत्री होती.
शार्दुलने गेल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र दुखापतीमुळे हैदराबादमधील वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला शार्दुलला मुकावं लागलं.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघात समावेश होऊनही शार्दुलला इशांत, शमी, बुमरा यांच्यासोबत पाचही सामन्यांमध्ये बाहेरच बसावं लागलं होतं. मात्र भुवनेश्वर आणि बुमराच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडीजविरुद्धच्या राजकोट कसोटीत त्याची वर्णी लागली आणि त्याला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.
View this post on InstagramHappy Bday!! @shardul_thakur lot’s of joy and happiness to you !!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement