MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय..
MS Dhoni : 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये कॅप्टन कूल धोनीनं दणदणीत षटकार खेचला आणि समस्थ भारतीयांनी तो ऐतिहासिक क्षण आणि धोनी या दोघांनाही डोक्यावर घेतलं... धोनीच्या याच कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. धोनीनं मारलेल्या त्या षटकारातला चेंडू ज्या ठिकाणी पडला त्या जागेला एमसीएनं धोनीचं नाव दिलंय... आज दस्तुरखुद्द धोनीनं वानखेडे स्टेडियमवर येत या जागेचं उद्घाटन केलयं.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं २०११ साली वानखेडे स्टेडियमवरच्या विश्वचषक अंतिम सामन्यात ठोकलेल्या निर्णायक षटकाराची आठवण प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही कायम आहे. याच आठवणीचं कायमस्वरुपी जतन करुन ठेवण्यात आले आहे. धोनीच्या त्या विजयी षटकारानंतर चेंडू वानखेडे स्टेडियमच्या विठ्ठल दिवेचा स्टॅंडमध्ये जिथं पडला, त्या खुर्च्यांच्या ठिकाणी धोनीच्या नावानं भारताच्या विश्वचषक विजयाचा स्मृतिफलक उभारण्यात येणारेय. त्याचे आज दस्तुरखुद्द धोनीनं वानखेडे स्टेडियमवर येत या जागेचं उद्घाटन केलयं. एएनआयने याचा व्हिडीओ पोस्ट केलाय.
वानखेडे स्टेडिअमवर २०११ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनीचा मॅच विनिंग षटकार आणि रवी शास्त्री यांचे समालोचन प्रत्येकाची उत्कंठा वाढवणारे होते. आजाही तो क्षण प्रत्येक क्रीडा प्रेमींच्या डोळ्यासमोर आहे. दोन एप्रिल २०११ रोजी धओनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखरा याला षटकार लगवात भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. तो क्षण हजारो भारतीयांसाठी अभिमानाचा होता.. धोनीचा हाच षटकार अजरामर झाला आहे.
#WATCH | Mumbai: MS Dhoni inaugurates 2011 World Cup victory memorial at the Wankhede stadium
— ANI (@ANI) April 7, 2023
Memorial has been built at the location where MS Dhoni’s historic winning six from 2011 WC had landed in the stands pic.twitter.com/PEGSksnWNa
MI vs CSK Match 12 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई
मुंबई इंडियन्स शनिवारी यंदाच्या मोसमातील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून पराभव झाला होता. तर दुसरीकडे चेन्नई संघाचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. पण, दुसऱ्या सामन्यात चेन्नईनं खातं उघडलं.
MI vs csk Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 3 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 14 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे.