Mohammed Shami : भारताचा तोफगोळा परतणार, मोहम्मद शामी पुनरागमन करणार, 'या' मालिकेतून मैदानात!
Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमन करणार आहे.
Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 2023 च्या विश्वचषकात भारतासाठी शेवटचा सामना खेळलेला मोहम्मद शमी पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी सज्ज झाला असल्याची माहिती आहे. दुखापतीमुळे बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेला शमी लवकरच पुनरागमन करणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे.
🚨 WELCOME BACK SHAMI. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 8, 2025
- Mohammad Shami set to be picked for the England series and 2025 Champions Trophy. (Cricbuzz). pic.twitter.com/gDyZ5PdWc0
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करत असलेला मोहम्मद शमी टीम इंडियात लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता आहे. रणजी ट्रॉफीनंतर शमीने सय्यद मुश्ताक अलीमध्ये चांगली कामगिरी केली होती. दरम्यान तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळतानाही दिसतोय. मोहम्मद शमी लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शमीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान मिळणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शमी पुन्हा एकदा वेगवान मारा करताना दिसू शकतो.
विजय हजारे टूर्नामेंटमध्येही शमीने आपल्या आक्रमक माऱ्याने विकेट्स पटकावल्या आहेत. शिवाय, त्याच्या गोलंदाजीने त्याने फिट असल्याचेही दाखवून दिले आहे. अजित आगरकर, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात 11 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संघाबाबत बैठक होणार असल्याचे मानले जात आहे. आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला 12 जानेवारीपर्यंत आपला संघ घोषित करायचा आहे.
मोहम्मद शमीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. यानंतर शमीला दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, गेल्या काही महिन्यांत शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या काही सामन्यांसाठी शमीचा संघात समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात होते. परंतु तसे झाले नाही, शमीने 2023 ;d/e विश्वचषक स्पर्धेत एकूण 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या.
Mohammad Shami is ready to roar in the Champions Trophy 🏆 #ChampionsTrophy2025
— Manoj Tiwari (@ManojTiwariIND) January 7, 2025
pic.twitter.com/DgpGCnownx
इतर महत्त्वाच्या बातम्या