एक्स्प्लोर

मिताली राज ICC वन डे संघाची कर्णधार!

आयसीसीच्या वन डे महिला संघात भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.

लंडन : आयसीसीने सोमवारी महिला विश्वचषक 2017 चा संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाला दोन वेळा विश्वचषकाच्या फायनलपर्यंत नेणाऱ्या मिताली राजवर आयसीसी वन डे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. मितालीने या विश्वचषकात 409 धावा केल्या. सेमीफायनलमध्ये 115 चेंडूत 171 धावांची तुफानी खेळी करणाऱ्या हरमनप्रीतचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या विश्वचषकात 12 विकेट्स आणि 216 धावा करणाऱ्या ऑलराऊंडर दीप्ती शर्मालाही संघात स्थान देण्यात आलं आहे. इंग्लंडच्या 4 खेळाडूंचा समावेश विश्वचषकात सर्वाधित 410 धावा करणारी इंग्लंडची खेळाडू टॅमसिन बेयुमोंटलाही संघात स्थान देण्यात आलं. आयसीसीच्या या संघात इंग्लंडच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. यापैकीच एक अन्या श्रबसोल आहे. तिने फायनलमध्ये सहा विकेट्स घेऊन इंग्लंडला विश्वचषक मिळवून दिला. सोबतच ती सामनावीराची मानकरीही ठरली. या विश्वचषकात तिने 12 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलरही या संघाची सदस्य आहे. या विश्वचषकात तिच्या नावावर 396 धावा, 4 झेल आणि 2 स्टम्पिंग आहेत. इंग्लंडची गोलंदाज अॅलेक्स हार्टलेलाही आयसीसीच्या वन डे संघात स्थान देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 3 खेळाडूंना संधी दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्तसह तीन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. या विश्वचषकात 13 विकेट घेणारी दक्षिण आफ्रिकेची स्टार गोलंदाज मारिजाने कॅप देखील आयसीसी महिला वन डे संघाची सदस्य आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन वॉनलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे. या विश्वचषकात तिने 15 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची केवळ एक खेळाडू आयसीसीने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या केवळ एकाच खेळाडूला स्थान दिलं आहे. एलिजा पॅरीचा संघात समावेश करण्यात आला आहे. या विश्वचषकात 369 धावा आणि सात विकेट घेणारी इंग्लंडची खेळाडू नताली सीव्हरला बारावं स्थान देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget