छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना
Khelo India Youth Games 2022 : बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेत पदक मिळवण्याचा या संघाने निर्धार केला.
या वर्षीच्या स्पर्धेत तब्बल 356 खेळाडू सहभागी झाले आहेत. 21 क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. हरियाणातील पंचकुला या मुख्य मैदानावर या स्पर्धा होत आहेत. 4 जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल. 13 जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे. आजपासून हे संघ हरियानाकडे रवाना होत आहेत. 8 जूनपर्यंत सर्व संघ तिकडे रवाना होतील. मागील तीन स्पर्धांवर महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी उंचावली आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र या वर्षी हॅट्ट्रीक करेल असा विश्वास शुभेच्छा देताना व्यक्त केला. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे टीम मॅनेजर आहेत.
सहभागी क्रीडा प्रकार
राज्यातील तब्बल 21 क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण 356 खेळाडू आहेत. कंसात सहभागी खेळाडूंची संख्या
कब्बडी (24), बॅडमिंटन (4), कुस्ती (33), गटका (16), थांग ता (5), योगासन (22), वेटलिफ्टिंग (20), जिम्नॅस्टिक (45), सायकल ट्रॅक ( 6), शुटिंग (7), टेनिस (6), मल्लखांब (12), जलतरण (28), खो-खो (24), बास्केटबॉल (12), अॅथलेटिक्स (36), टेबल टेनिस (8), बॉक्सिंग (16), ज्युदो (14), सायकल रोड रेस (6), आर्चरी (12). असे 21 संघ स्पर्धेत उतरले आहेत.
मुलांचा संघ असा
भरत भवर, प्रशांत नगरे, अमरसिंग कश्यप, पृथ्वीराज चव्हाण, वैभव रबडे, युवराज शिंदे, दादासाहेब पुजारी, पृथ्वीराज शिंदे, जयेश महाजन, श्रीपाद पाटील, सचिन म्हसरूफ, रोहन तुपारे.
मुलींचा संघ असा
हरजीतकौर संधू, शिवरजनी पाटील, आरती ससाणे, कोमल ससाणे, रिद्धी हडकर, हर्षदा पाटील, किरण तोडकर, मनिषा राठोड, निकिती लंगोटे, यशिका पुजारी, मुस्कान लोखंडे, ऋतुजा अवघडी.