Maharashtra Kesari Shivraj Rakshe : शाब्बास रे पठ्ठे! शेतकरीपुत्र शिवराजचं नेत्रदीपक यश; शरद पवारांसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव
शेतकरीपुत्र शिवराजच्या या यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून कौतुक होतंय. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी' जिंकत जज्बा दाखवून दिला आहे.
Maharashtra Kesari Shivraj Rakshe : 'महाराष्ट्र केसरी' खिताब विजेता मल्ल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याचं सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. शेतकरीपुत्र शिवराजच्या या यशाचं राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून कौतुक होतंय. दुखापतीमुळे गतवर्षी माघार घ्यावी लागलेल्या शिवराज राक्षेनं यंदा 'महाराष्ट्र केसरी' जिंकत जज्बा दाखवून दिला आहे. कुठलीही माघार कायमस्वरुपी नसते हे दाखवून दिलं आहे. शिवराजच्या जिद्द, प्रयत्नांचे कौतुक करावं तितकं थोडं आहे, अशा शब्दात त्याचं कौतुक केलं जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राची गौरवशाली कुस्तीपरंपरा पुढे नेण्याचं काम शिवराज आणि महेंद्र या दोघांकडून भविष्यात होईल. महाराष्ट्राला कुस्तीतली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून देण्यासाठी शिवराज राक्षे याचा विजय प्रेरणादायी ठरेल. राज्यातील कुस्तीपटूंच्या, कुस्ती चळवळीच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी राज्य सरकारने पार पाडावी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन!#महाराष्ट्र_केसरी pic.twitter.com/v46nuwpRmI
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 14, 2023
शेतकरीपुत्र असलेल्या पै.शिवराज राक्षे याने यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. समोर भरभक्कम आवाहन असतानाही नेत्रदीपक कामगिरी करत शिवराजने हा विजय खेचून आणला आहे. महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे याचे मनापासून अभिनंदन! pic.twitter.com/jh0Cq1nfjP
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) January 14, 2023
पुण्याचा पै. शिवराज राक्षे ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी पै. शिवराज व उपविजेता पै. महेंद्र गायकवाड या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.#महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/JNgP80PuP1
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 14, 2023
शाब्बास रे पठ्ठ्या!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 14, 2023
पुण्याचा पै. शिवराज राक्षे ठरला यंदाचा #महाराष्ट्र_केसरी !
महाराष्ट्र केसरी पै. शिवराज व उपविजेता पै. महेंद्र गायकवाड या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/VA4qQ7VAaz
💪🏻 अभिमानास्पद... 💪🏻
— Prasad Lad (@PrasadLadInd) January 14, 2023
पै. शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी' चा मानकरी! 🚩✌️
महाराष्ट्रातील मानाचा कुस्ती किताब 'महाराष्ट्र केसरी' पटकावल्याबद्दल पै. शिवराज राक्षे चे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!💐#महाराष्ट्र_केसरी pic.twitter.com/O8oTGtJw5w
खेड तालुक्याचे सुपुत्र पै. शिवराज राक्षे हा या वर्षाचा 'महाराष्ट्र केसरी' ठरला. अतिशय चुरशीच्या लढतीत त्याने हे यश मिळविले. याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!#महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/P1ioIDKxOp
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) January 14, 2023
अभिमानास्पद! आपल्या खेडचा सुपुत्र शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन! शिवराज आपण महाराष्ट्र व देशाचं प्रतिनिधित्व करून अशीच चमकदार कामगिरी करत राहो, याच शुभेच्छा!#महाराष्ट्र केसरी pic.twitter.com/BRd9TQCiuY
— Sunil Tingre (@suniltingre) January 14, 2023
शाब्बास रे पठ्ठ्या!#महाराष्ट्र_केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाच्या गदेवर आपलं नाव कोरल्याबद्दल मल्ल शिवराज राक्षे याचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! तर या स्पर्धेत चांगली लढत दिल्याबद्दल उप-महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याचंही अभिनंदन! pic.twitter.com/ZunjZjKVsS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 14, 2023