एक्स्प्लोर
Advertisement
IndvsAus : टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला लोळवलं!
शिमला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली.
रहाणेच्या वेगावन फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचं 106 धावांचं आव्हान तुटपुंज ठरलं. रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले. पॅट कमिन्सला सलग दोन षटकार ठोकून, रहाणेने ऑस्ट्रेलियाची हवा काढली.
दुसरीकडे या कसोटी मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर के एल राहुलने आणखी एक नाबाद अर्धशतक झळकावलं. राहुलने 76 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.
या कसोटी सामन्यात आणि मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जाडेजाला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या. मग भारताने 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 137 धावा केल्या, त्यामुळे भारताला विजयासाठी 106 धावांची गरज होती.
रहाणेच्या नेतृत्त्वात विजय
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली खेळताना पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजय साजरा केला. टीम इंडियानं ही मालिकाही 2-1 अशी खिशात टाकून बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे.
चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 87 धावांचं माफक लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना मुरली विजय आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलनं 76 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 51 धावांची खेळी रचली. तर रहाणेनं 27 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 38 धावा फटकावल्या.
संपूर्ण कसोटी मालिकेतील विक्रम
सर्वाधिक विकेट -
- रवींद्र जाडेजा - 25
- आर अश्विन - 21
- ओकिफ - 19
- लायन - 19
- स्टीव्ह स्मिथ - 499
- चेतेश्वर पुजारा - 405
- के एल राहुल - 393
- वि. न्यूझीलंड : 3-0
- वि. इंग्लंड : 4-0
- वि. बांगलादेश : 1-0
- ऑस्ट्रेलिया : 2-1
- कसोटी खेळणाऱ्या सर्व नऊही देशांविरोधात कसोटी मालिका जिंकण्याऱ्या देशांच्या यादीत भारताचा नंबर
- विराट कोहलीच्या नेतृत्त्वात सलग 7 कसोटी मालिका विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement