एक्स्प्लोर

Khelo India : महाराष्ट्र सुसाट, वेटलिफ्टिंगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम

Khelo India Youth games : आकांक्षा व्यवहारेचे 45 किलो गटात पहिले सुवर्ण मिळवले तर वेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रम

Khelo India Youth games : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित सुरुवात करताना महाराष्ट्राचा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील पदकांचा वेग कायम राखला. महाराष्ट्र अजूनही पदकतालिकेत आघाडीवर असून, महाराष्ट्राची २८ सुवर्ण, ३० रौप्य आणि २५ ब्राँझ अशी एकूण ८३ पदके झाली आहेत. आता उद्यापासून सुरु होणाऱ्या जलतरण क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या कामगिरीची जोड मिळणार आहे. हरियाना २३, १८, १५ अशा ५६ पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश २३, १३, २० अशा ५६  तिसऱ्या स्थानावर आहेत. सुवर्ण आणि एकूण पदक संख्येत हरियाना, मध्य प्रदेशची बरोबरी असून, रौप्यपदकांच्या आघाडीने हरियाणाने दुसरे स्थान मिळविले.

वीणाताई आहेर हिने स्नॅचमध्ये ५७ आणि क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात ७२ असे एकूण १२९ किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान मिळविला. दोन्ही प्रकारात तिसऱ्या प्रयत्नांत तिने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. वीणाने दुसऱ्या क्रमांकावरील ज्योत्स्ना साबर (११८) आणि प्रितीस्मिता  भोज (११७) या ओडिशाच्या दोघींना मोठ्या फरकाने मागे टाकले. वीणाने या स्पर्धेत क्लीन ॲण्ड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. वीणाताईने आकांक्षा व्यवहारेच्या ७१ किलो वजनाचा विक्रम एका किलोने मोडीत काढला. आकांक्षाने गेल्यावर्षी मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विक्रमाची नोंद केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात आकांक्षाने ४५ किलो गटात स्नॅचमध्ये ६७ आणि क्लिन ॲण्ड जर्कमध्ये ७७ असे १४४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. तिला महाराष्ट्राच्याच अस्मिता ढोणेकडून आव्हान मिळाले. मात्र, अस्मिता स्नॅच प्रकारात (६१ किलो) मागे राहिली. मात्र, क्लिन ॲण्ड जर्कमध्ये अस्मिताने ८२ किलो वजन उचलून नव्या विक्रमाची नोंद केली. ती १४३ किलो वजन उचलून रौप्यपदकाची मानकरी ठरली. या दोन्ही खेळाडूंना प्रवीण व्यवहारे आणि तृप्ती पराशर यांचे मार्गदर्शन मिळते.  

नेमबाजीत सानियाला ब्राँझपदक कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील सानिया सापले हिने ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ब्राँझपदक.

 सानिया हिचे खेलो इंडिया मधील हे पहिलेच पदक आहे. आतापर्यंत झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने जवळजवळ पन्नास पदकांची कमाई केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कष्ट करायची तिची तयारी आहे. अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेणारी सानिया कोल्हापूर आणि नवी दिल्ली येथे वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.‌ महाराष्ट्राला नेमबाजीत येथे एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई झाली.

स्लॅलममध्ये अपयशी सुरुवात

महाराष्ट्राला साहसी क्रीडा प्रकारातील स्लॅलम (कॅनॉइंग-कयाकिंग) मध्ये अपयश आले. या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र प्रथमच सहभागी झाले होते. महाराष्ट्राची मनस्वी राईकवार ही ७२४.९७६ सेकंद अशी वेळ देत सहाव्या स्थानावर राहिली. यजमान मध्य प्रदेशाच्या मानसी बाथमने सुवर्ण, तर हरियानाच्या प्रिती पालने रौप्यआणि कर्नाटकाच्या धरिती मारियाने ब्रॉंझपदक मिळविले.  या प्रकारातील दुसऱ्या म्हणजे कयाकिंगमध्ये उद्या जान्हवी राईकवार आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

कबड्डीत पुन्हा संमिश्र यश

कबड्डीत दुसऱ्या दिवशी देखिल संमिश्र यशावर समाधान मानावे लागले. पहिल्या दिवशी हरियाणाविरुद्ध पराभव पत्कराव्या लागणाऱ्या मुलींनी आज तेलंगणाचा ६४-१६ असा ४८ गुणांनी पराभव केला. हरजित, मनिषा, ऋतुजा यांच्या तुफानी खेळाने मंध्यतरालाच ३१ गुणांची आघाडी घेत महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. उत्तरार्धात खेळाचा वेग काहीसा संथ केला. उत्तरार्धात आणखी १७ गुणांची कमाई करताना महाराष्ट्राने मोठा विजय मिळविला.  मुलांच्या संघाला बिहारविरुद्धच्या विजयी खेळातील सातत्य राखता आले नाही. मुलांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, राजस्थानविरुद्ध हे प्रयत्न २७-२८ असे एका गुणाने कमी पडले. 

टेनिसमध्ये विजयी सुरुवात

टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षित सुरुवात केली. महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चौघांनीही एकतरर्फी विजयाची नोंद केली. मुलींच्या गटात पुण्याच्या अस्मी आडकरने बंगालच्या सोहिनी मोहंतीचा कडवा प्रतिकार १-६, ६-२, ६-१ असा मोडून काढला. मधुरिमा सावंतने दिल्लीच्या लक्ष्मी गौडा हिचा ६-१, ६-२, तर निशीत रहाणेने मेघालयाच्या इशान रावतचा ६-१, ६-० असा फडशा पाडला. रिया गायकैवारीला हरियानाच्या सुर्यांशी तन्वर हिने झुंजवले. रियाने तीन सेटपर्यंत रंगलेली लढत ६-१, ४-६, ६-१ अशी जिंकली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget