Women’s Hockey League : खेलो इंडिया! अंडर-16 महिला हॉकी लीगला होणार सुरुवात, वाचा सविस्तर
Khelo India अंडर-16 महिला हॉकी लीगच्या सामन्यांना 16 ऑगस्टपासून सुरुवात होत असून या लीगमध्ये एकूण 16 संघ सहभागी होत आहेत.
![Women’s Hockey League : खेलो इंडिया! अंडर-16 महिला हॉकी लीगला होणार सुरुवात, वाचा सविस्तर Khelo India Womens Hockey League Under 16 Matches Starts from 16 august Women’s Hockey League : खेलो इंडिया! अंडर-16 महिला हॉकी लीगला होणार सुरुवात, वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/66b1a4236dee8aa468a73a64353371621660583034258323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Women’s Hockey League : खेलो इंडिया मोहिमेतंर्गत अंडर-16 महिला हॉकी लीग 2022 उद्यापासून (16 ऑगस्ट) सुरू होत आहे. भारताच्या प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये सामन्यांची सुरुवात होणार आहे.या महिला हॉकी लीगमध्ये 16 संघ सहभागी होणार आहेत. या लीगच्या लीग सामन्यांसाठी, संघांची विभागणी दोन पूलमध्ये करण्यात आली असून पूल अ आणि पूल ब असे दोन पूल आहेत.
खेलो इंडिया अंडर-16 महिला हॉकी लीग 2022 चा पहिला टप्पा 23 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या लीगमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला 2 गुण तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल. तर पराभूत संघांना शून्य गुण मिळतील. या लीगमध्ये यावेळी एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. तर दोन्ही संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
'हे' संघ घेणार सहभाग
या लीगमध्ये अ गटात भारतीय क्रीडा प्राधिकरण 'अ', भाई बहलो हॉकी अकादमी भगता, घुमनहेरा रायझर अकादमी, सिटीझन हॉकी इलेव्हन, स्मार्ट हॉकी अकादमी रायपूर, प्रीतम सिवाच हॉकी अकादमी सोनीपत, मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन आणि स्पोर्ट्स हॉस्टेल भुवनेश्वर यांचा समावेश आहे. तर ब गटात भारतीय क्रीडा प्राधिकरण 'बी', अनंतपूर हॉकी अकादमी, एचएआर हॉकी अकादमी, दिल्ली हॉकी, मध्य प्रदेश हॉकी अकादमी, ओडिशा नेव्ही टाटा हॉकी हाय परफॉर्मन्स सेंटर, सॅल्यूट हॉकी अकादमी आणि गुजरात क्रीडा प्राधिकरण अकादमी यांचा समावेश आहे.
कॉमनवेल्थ भारतीय महिलांची कांस्यपदकाला गवसणी
कॉमनवेल्थ स्पर्धेत (Birmingham Commonwealth Games 2022) महिला हॉकी स्पर्धेत कांस्यपदकासाठी खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत केलं. नियमित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. मात्र, यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला. भारतीय महिला हॉकी संघ आणि न्यूझीलंड महिला हॉकी संघात आज कांस्यपदाकासाठी सामना रंगला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं चेंडू स्वत:जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, तरीही दोन्ही संघाला गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरच्या 14व्या मिनिटाला भारतानं पहिला गोल केला. सलीमा टेटेनं गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वॉर्टरच्या शेवटच्या क्षणी न्यूझीलंडच्या संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यात फायदा घेत न्यूझीलंडनं करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)