एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khel Ratna Awards : यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.
पैलवान साक्षी मलिक आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचा अपवाद वगळता खेलरत्न आणि अर्जुन क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. साक्षी आणि मीराबाईचा अर्जुन पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आला होता. पण त्या दोघींना खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आधीच मिळाला आहे. त्यामुळं त्यांची नावं वगळून अर्जुन पुरस्कारांच्या यादीला केंद्र शासनानं मंजुरी दिली.
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मासह पाच खेळाडूंना खेळांडूंच्या नावाची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली होती. खेलरत्नसाठी या पाचही जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी
Khel Ratna Award 2020 : 'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)
धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती
द्रोणाचार्य पुरस्कार
ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन
अर्जुन पुरस्कार
ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
अतनू दास - तिरंदाजी
द्युती चंद - अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज
Suresh Rain Retirement | धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement