Kalyan Chaubey: कल्याण चौबे एआयएफएफचे नवे अध्यक्ष, 85 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी खेळाडूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीत दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतियाचा (Bhaichung Bhutia) पराभव केलाय.
All India Football Federation : भारताचे माजी गोलकीपर आणि भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे नेते कल्याण चौबे (Kalyan Chaubey) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) अध्यक्षपदी निवड झाली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीत दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतियाचा (Bhaichung Bhutia) पराभव केलाय. विशेष म्हणजे, आखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या 85 इतिहासात पहिल्यांदाच माजी खेळाडू अध्यक्षपदाची जबाबदारी संभाळणार आहेत.
ट्वीट-
नवी दिल्लीत आज मतदान
एआयएफएफ निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत मतदान झालं. या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी भुतियाविरुद्ध 33-1 अशा मोठ्या फरकानं विजय मिळवलाय. एआयएफएफच्या 85 वर्षांच्या इतिहासात कल्याण चौबे यांच्या रुपात पहिल्यांदाच माजी खेळाडूची अध्यक्षपदी निवड झालीय. तर, एनए हरिस यांची उपाध्यक्षपदी जबाबदारी संभाळतील. हरिस हे कर्नाटक फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्यातील काँग्रेसचे आमदार आहेत. भारतातील 36 राज्य फुटबॉल संघटनांपैकी केवळ 34 संघटनांनी निवडणुकीत भाग घेतला. लडाख आणि जम्मू आणि काश्मीरला मतदान करण्याची परवानगी नव्हती.
पराभवानंतर भुतियांची प्रतिक्रिया
“मी भविष्यातही भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी काम करत राहीन. अभिनंदन कल्याण. मला आशा आहे की, तो भारतीय फुटबॉलला आणखी पुढं नेईल. मला पाठिंबा देणाऱ्या भारतीय फुटबॉल चाहत्यांचे आभार. निवडणुकीपूर्वीही मी भारतीय फुटबॉलसाठी काम करत होतो आणि यापुढंही करत राहीन. होय, मी कार्यकारी समितीचा सदस्य आहे."
नाट्यमय घडामोडींनाही पूर्णविराम
एआयएफएफच्या निवडणुकीमुळं भारतीय फुटबॉलमधील गेल्या काही महिन्यांतील नाट्यमय घडामोडींनाही पूर्णविराम मिळाला. दरम्यान, भारतीय फुटबॉलनं माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक न घेतल्यानं पदावरून हटवण्यात आलं. यानंतर प्रशासकांची समिती स्थापन करण्यात आली, जी नंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलनं एआयएफएफवर निलंबनाची कारवाई केली होती. एआयएफएफमध्ये ‘तिसऱ्या पक्षाचा’ हस्तक्षेप वाढला असल्याचं कारण देऊन फिफानं तात्काळ निलंबनाची कारवाई केली होती.
हे देखील वाचा-