एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धोनीच्या निवृत्तीनंतर झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बीसीसीआयला केली 'ही' अनोखी मागणी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती काल जाहीर केली.यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील धोनीचं कौतुक केलंय आणि सोबतच एक मागणी देखील बीसीसीआयकडे केलीय.
रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील धोनीचं कौतुक केलंय आणि सोबतच एक मागणी देखील बीसीसीआयकडे केलीय. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धोनीचं आतापर्यंतच्या खेळासाठी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'धोनी हा संपूर्ण देश आणि झारखंडचा गौरव आहे. माझ्या मते धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा. मी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित केला जावा', अशी मागणी सोरेन यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटलं आहे की, या सामन्याचे साक्षीदार संपूर्ण विश्व असेल. बीसीसीआयनं यासाठी पुढाकार घ्यावा. या सामन्याचं आयोजन संपूर्ण झारखंड करेल, असं त्यांनी म्हटलंय. MS Dhoni | 'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं धोनीनं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या. संबंधित बातम्या : MS Dhoni Retires: मै पल दो पल का शायर हूँ... निवृत्ती जाहीर करताना महेंद्र सिंह धोनी भावूक Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यासदेश और झारखण्ड को गर्व और उत्साह के अनेक क्षण देने वाले माही ने आज अंतराष्ट्रीय क्रिकेट से सन्यास ले लिया है।हम सबके चहेते झारखण्ड का लाल माही को नीली जर्सी पहने नहीं देख पायेंगे।पर देशवासियों का दिल अभी भरा नहीं। मैं मानता हूँ हमारे माही का एक फ़ेयरवेल मैच राँची में हो जिसका 1/2 pic.twitter.com/XFt5zBSvG8
— Hemant Soren (घर में रहें - सुरक्षित रहें) (@HemantSorenJMM) August 15, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement