एक्स्प्लोर

WPL 2023 : आज मुंबई इंडियन्सचा संघ उतरणार मैदानात, समोर यूपी वॉरियर्सचं आव्हान, कधी कुठे पाहाल सामना?

MI-W vs UPW-W, Match Preview : पहिल्या तीनही सामन्यात विजयी झालेला मुंबई इंडियन्सचा संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी आज मैदानात उतरत आहे.

WPL 2023 :  महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आज (12 मार्च) हंगामातील दहावा सामना खेळवला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स (MI vs UPW) या संघांमध्ये होणार आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या यंदाच्या हंगामात अप्रतिम कामगिरीमुळे चर्चेत असणारा मुंबई इंडियन्सचा संघ आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाही. तीनपैकी तीनही सामन्यात विजय मिळवणाऱ्या मुंबईचा स्पर्धेतील हा चौथा सामना आहे. दुसरीकडे यूपी संघाने देखील तीन सामने खेळले असून त्यातील दोन जिंकले आहेत. दरम्यान दोन्ही संघाची आतापर्यंतची खेळी चांगली असल्याने एक रंगतदार सामना (Mumbai Indians vs UP Warriors) आज पाहायला मिळू शकतो. तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...

सामना कधी होणार?

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 12 मार्च रोजी सामना होणार आहे.

सामना कुठे होणार?

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सया महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.

सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.

कसे असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग 11?

यूपी वॉरियर्सचा संभाव्य संघ : अलिसा हेली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

मुंबई इंडियन्सा संभाव्य संघ :  हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget