IND vs AUS 4th Test Day 4 Highlights : विराटच्या शतकाने गाजवला चौथा दिवस, भारताकडे 88 धावांची आघाडी, दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 3/0
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं 480 धावा केल्यावर भारतानं 571 धावा केल्या, ज्यानतंर चौथा दिवस संपताना ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता 3 धावा केल्या आहेत.
IND vs AUS 4th Test : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने एक चांगली धावसंख्या करुन सामन्यात आपलं पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत तब्बल 480 धावा स्कोरबोर्डवर लावल्यावर भारतानं चोख प्रत्यूत्तर देत शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि विराट धावांकोहली (Virat Kohli) यांच्या शतकाच्या मदतीनं 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. चौथा दिवस संपताना ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता 3 धावा केल्या असल्याने भारत सध्या 88 धावांच्या आघाडीवर सामन्यात आहे.
Australia unscathed after India take lead.#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSMyd pic.twitter.com/tECXazgG0H
— ICC (@ICC) March 12, 2023
सामन्यात सर्वात आधी टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या करण्याचा त्यांचा डाव होता. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांच्या शतकाने तो डाव पूर्णही झाला. उस्मान ख्वाजाने 180 धावा केल्या. ख्वाजा याने 422 चेंडूचा सामना करताना 21 चौकारांच्या मदतीने 180 धावा केल्या. तर ग्रीन याने 114 धावांची खेळी केली. याशिवाय मर्फीने 34, ट्रॅविस हेड 32, स्मिथ 38 यांनीही धावा करत आपआपलं योगदान दिलं. दरम्यान या डावात भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने दोन आणि जाडेजा, अक्षर पटेलने प्रत्येकी एक एक विकेट घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली भारताला करुन दिली. पण तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर रोहित शर्मा 35 धावा करुन बाद झाला. मग पुजारा गिलने चांगली भागिदारी केली. पण पुजारा 42 धावा करुन बाद झाला.मग गिलनं शतक पूर्ण केलं 128 धावांवर तो बाद झाल्यावर कोहली संयमी खेळी करत होता. जाडेजासोबत त्यानं चांगली पार्टनरशिप केली. 28 धावांवर जाडेजा बाद झाला. मग श्रीकर भरत 44 रनांवर तंबूत परतल्यावर अक्षर पटेलंन दमदार अशी 79 धावांची खेळी केली. त्यानंतर अश्विन 7 उमेश यादव 0 धावांवर बाद झाल्यावर अखेर कोहली 186 रनांवर बाद झाला. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर फलंदाजी करु शकला नाही. ज्यामुळे भारतानं 571 धावा केल्या असून आता ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत आहे. दिवस संपताना ऑस्ट्रेलियाने 3 धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.
दिर्घकाळानंतर ठोकलं विराटनं कसोटी शतक
जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं आहे. याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही. दरम्यान 2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली होती, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आली होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक ठोकल्यावर विराट पुन्हा फॉर्मात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.
हे देखील वाचा-