(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WPL 2023 : लीग फेरीतील अखेरचा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कधी कुठे पाहाल मॅच?
UPW-W vs DC-W, Match Preview : महिला आयपीएलच्या लीग फेरीतील अखेरचा सामना आज युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळवला जाणार आहे.
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेचा यंदाचा हा पहिलाच हंगाम सुरु असून आता स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे. आज (21 मार्च) लीग फेरीतील अखेरचा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (UP Warriors vs Delhi Capitals) असा खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार असून दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचा विचार केल्यास दोघांनी देखील प्रत्येकी 7-7 सामने खेळले असून दिल्ली कॅपिटल्स संघाने 5 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. तर युपी संघाने 4 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत.दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असून मुंबई इंडियन्सही प्लेऑफचे सामने खेळणार आहे. दोघांनी यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केल्याने एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो... तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...
सामना कधी होणार?
युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये आज म्हणजेच 21 मार्च रोजी हा सामना होणार आहे.
सामना कुठे होणार?
युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या महिला संघांमध्ये सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता टॉस होईल.
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
कसे आहेत दोन्ही संघ?
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ : मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, तीतस साधू, स्नेहा दीप्ती, लॉरा हॅरिस, पूनम यादव
यूपी वॉरियर्स महिला संघ : अॅलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, शबनीम बेलडमी, लाक्सन बेल, लाक्सन शेख , पार्शवी चोप्रा , सोप्पधंडी यशश्री
हे देखील वाचा-