(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईच्या गोलंदाजाने घेतली महिला आयपीएलमधील पहिली हॅट्रिक, पाहा व्हिडीओ
Issy Wong Hattrick : मुंबईने युपीचा 72 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Issy Wong Hattrick : मुंबईने युपीचा 72 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये रविवारी फायनलचा थरार रंगणार आहे. ईसी वोंग हिच्या भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईने युपीचा पराभव केला. ईसी वोंग हिने वुमन्स प्रिमियर लीगमधील पहिली हॅट्रिक नोंदवली.
मुंबईकडून इसी वोंग हिने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. यामध्ये एकाच षटकात सलग तीन विकेट घेत वोंगने इतिहास रचलाय. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिली हॅट्रिक वोंग हिने घेतली. यामध्ये किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एल्केस्टोन यांचा समावेश आहे. इसी वोंग हिने चार षटकात 15 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या.
सुरुवातीला झटपट विकेट पडल्यानंतर किरण नवगिरे हिने युपीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. किरण नवगिरे 43 धावांवर खेळत होती. डावाच्या 13 व्या षटकात ईसी वोंग हिने किरण नवगिरे हिला नेट सायवरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर सिमरन शेख हिला त्रिफाळाचीत केले. सिमरन हिला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर सोफी एक्लेस्टोन हिला ईसाने शून्यावर तंबूत धाडले.
पाहा ईसा वोंगची हॅट्रिक
𝙁𝙄𝙍𝙎𝙏 𝙃𝘼𝙏-𝙏𝙍𝙄𝘾𝙆 𝙀𝙑𝙀𝙍 𝙄𝙉 #𝙏𝘼𝙏𝘼𝙒𝙋𝙇 🔥
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 24, 2023
Take a bow Issy Wong 🫡
Follow the match ▶️ https://t.co/QnFsPlkrAG#Eliminator | #MIvUPW pic.twitter.com/n3ZKFaxNvP
सामन्याचा लेखाजोखा -
Nat Sciver-Brunt च्या 72 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारला. यात्सिका भाटिया हिने 21 तर हेली मॅथ्युज हिने 26 धावांचे योगदान दिले. हरमनप्रीत कौर 14 तर अमेलिया केर हिने 29 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून सोफियाने सर्वाधइक दोन विकेट घेतल्या. तर अंजली सरवनी आणि पी चोप्रा हिने एक एक एक विकेट घेतली. मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपीची सुरुवात निराशाजनक झाली. श्वेता शेरावत अवघ्या एका धावेवर तंबूत परतली. त्यानंतर ताहिला सात धावा काढून बाद झाली. त्याशिवाय एलिसा हेली 11 धावा काढून बाद झाली. किरन नवगिरे हिने सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. ग्रेस हेरिस 14, दिप्ती शर्मा 16 यांनी छोटेखानी खेळी केली. पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. परिणामी युपीचा संघ 17.4 षटकात 110 धावांत सर्वबाद झाला. मुंबईकडून इसी वोंग हिने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. यामध्ये एकाच षटकात सलग तीन विकेट घेत वोंगने इतिहास रचलाय. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिली हॅट्रिक वोंग हिने घेतली. वोंगशिवाय साइका इसाकी हिने दोन विकेट घेतल्या.
History: Issy Wong takes the first ever hat-trick in WPL.
— Johns. (@CricCrazyJohns) March 24, 2023