Beed Fake Medicine : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा
Beed Fake Medicine : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा
बीड मधील अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा झाल्याची लिंक भिवंडीत असल्याचा समोर आला आहे. भिवंडी शहरातील नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत भद्रा कंपाउंड मधील ओसवाल दर्शन इमारतीच्या गाळा क्रमांक तीन मध्ये ऍक्टिव्हेंटिस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून या औषधाचा पुरवठा केला गेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने मिहीर त्रिवेदी सह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून या औषधाचा पुरवठा ठाणे जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे याची चौकशी केली जात आहे तसेच भिवंडी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात या औषधांचा पुरवठा झाला आहे का याची देखील चाचपणी केली गेली आहे. मात्र या संदर्भात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असून नारकोली पोलीस ठाण्यात या संदर्भात कोणतेही नोंद नसून या संपूर्ण घटनेचे तपास सध्या अन्न औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस करत आहेत