Virat Kohli : "चिते की चाल, बाझ की नजर और कोहली के थ्रोपर संदेह नही करते," शाहरुख खानचा करेक्ट कार्यक्रम, पाहा व्हिडीओ
Virat Kohli : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मॅच सुरु आहे. विराट कोहलीच्या एका थ्रोनंतर गुजरातचा डाव गडगडला.
IPL 2024, GT vs RCB बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात मॅच सुरु आहे. फाफ डु प्लेसिसनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या बॉलर्सनी कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवत गुजरातवर सुरुवातीपासून दबाव कायम ठेवला. आरसीबीनं गुजरात टायटन्सला 147 धावांवर रोखलं. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीच्या बॉलर्सना एखाद्या संघाच्या 10 विकेट घेण्यात यश आलं.
गुजरात टायटन्सचा डाव 147 धावांवर आटोपला
गुजरात टायटन्सनं 2022 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर गुजरातनं 2023 च्या आयपीएलमध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणं झालेली नाही. गुजरातच्या डावाच्या सुरुवातीलाच मोहम्मद सिराजनं दोन धक्के दिले. रिद्धिमान साहा 1 आणि शुभमन गिल 2 धावा करुन बाद झाला. यानंतर साई सुदर्शन देखील मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. कॅमेरुन ग्रीननं साई सुदर्शनला 6 धावांवर बाद केलं.
मिलर- शाहरुख खानचा डाव सावरण्याचा प्रयत्न
गुजरातल तीन धक्के बसल्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न डेव्हिड मिलर आणि शाहरुख खान यांनी केला. मात्र, ते मोठी धावसंख्या करत गुजरातला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवू शकले नाहीत. डेव्हिड मिलर 35 धावांवर बाद झाला. त्याला कर्ण शर्मानं बाद केलं.
विराट कोहलीचा अफलातून थ्रो, शाहरुख खान बाद
गुजरातचा डाव सावरणाऱ्या शाहरुख खानला विराट कोहलीच्या एका थ्रो मुळं माघारी जावं लागलं. डेव्हिड मिलरनं मारलेल्या शॉटनंतर शाहरुख खान धावत सुटला मात्र मिलरनं क्रीज सोडलं नव्हतं. त्याचवेळी बॉल विराट कोहलीच्या हातात गेला होता. विराटनं नॉन स्ट्राइकर एंडला थ्रो करत स्टम्प उडवला. यामुळं शाहरुख खानला 37 धावांवर बाद होत परत जावं लागलं.
पाहा व्हिडीओ
𝘾𝙝𝙚𝙚𝙩𝙚 𝙠𝙞 𝙘𝙝𝙖𝙖𝙡, 𝘽𝙖𝙖𝙯 𝙠𝙞 𝙣𝙖𝙯𝙖𝙧, 𝘼𝙪𝙧 𝙆𝙤𝙝𝙡𝙞 𝙠𝙚 𝙩𝙝𝙧𝙤𝙬 𝙥𝙖𝙧 𝙨𝙖𝙣𝙙𝙚𝙝 𝙣𝙖𝙝𝙞 𝙠𝙖𝙧𝙩𝙚 😌#RCBvGT #TATAIPL #IPLonJioCinema #ViratKohli pic.twitter.com/xNhbIBu9Yw
— JioCinema (@JioCinema) May 4, 2024
गुजरातचा डाव गडगडला
शाहरुख खान आणि डेव्हिड मिलर बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा डाव गडगडला राहुल तेवातियानं 35, राशिद खाननं 18, विजय शंकरनं 10, मानव सुथार 1 रन करुन बाद झाला. मोहित शर्मा आणि नूर शर्माला खातं उघडता आलं नाही.