Virat Kolhi IPL : बॅट चालली नाही, सामना गमावला आणि आता लाखोंचा दंड... कोहलीच्या अडचणीत वाढ
Virat Kohli Fined IPL : विराट कोहलीला (RCB) चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
Virat Kohli Fined for Breaching IPL Rule : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्धचा सामना आठ धावांनी गमावला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील या सामन्यात आरसीबीचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट चालली नाही. आरसीबी संघाने हा सामना गमावला त्यानंतर कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. विराट कोहलीला लाखोंचा दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
सामना गमावला आणि आता दंड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा फलंदाज विराट कोहलीला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या TATA इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. कोहलीला त्याच्या सामन्यातील मानधनाच्या 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
विराट कोहलीला लाखोंचा दंड
आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला 10 टक्के फी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 अंतर्ग अंपायरचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. याचे उल्लंघन केल्यास दंड ठोठावण्यात येतो.
जल्लोष साजरा करणं महागात
दरम्यान, विराट कोहलीला कोणत्या घटनेसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आयपीएल जारी केलेल्या निवेदनात घटनेचा उल्लेख नाही, पण कोहलीने चेन्नईचा फलंदाज शिवम दुबेची विकेट घेतल्यानंतर जल्लोष केला होता. त्याच्या त्यावेळीच्या प्रतिक्रियेसाठी हा दंड ठोठावण्यात आला असावा, अशी शक्यता आहे. सतराव्या षटकात चेन्नईचा फलंदाज शिवम दुबेला मोहम्मद सिराजने डीपमध्ये झेलबाद केलं.
आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याने हा दंड स्वीकारला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजी वेळी 17 व्या षटकात जेव्हा शिवम दुबे 27 चेंडूत 52 धावांची आक्रमक खेळी खेळून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केलं. कोहलीची सेलिब्रेशन करण्याची पद्धत योग्य नव्हती आणि त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आल्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :