(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : 'सुपरमॅन' रहाणे! मॅक्सवेलचा षटकार ठोकण्याचा प्रयत्न, अजिंक्यनं केलं काही असं...; दमदार फिल्डिंग पाहून सारेच चकित
RCB vs CSK IPL 2023 : ग्लेन मॅक्सवेलने नवव्या षटकात दमदार षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला पण, बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या रहाणेने मात्र जबरदस्त फिल्डींग करून चेंडू उडवला.
Ajinkya Rahane Fielding in CSK vs RCB Match : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 8 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात CSK संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 226 धावांची मोठी धावसंख्या उभारली. मात्र, आरसीबी संघानेही सामन्यात दमदार फलंदाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांनी अवस्था बिघडवली होती. चेन्नईच्या गोलंदाजांनी दिलेल्या अतिरिक्त धावा आणि खराब फिल्डींगमुळे बंगळुरुनेही 200 धावांचा टप्पा सहज पार केला होता. मात्र अखेर आरसीबीला 218 धावाच करता आल्या. बंगळुरु विरुद्धचा सामना चेन्नईने आठ धावांनी जिंकला.
मॅक्सवेलचा षटकार ठोकण्याचा प्रयत्न, पण अजिंक्यनं केलं काही असं...
आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (17 एप्रिल) बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर झालेल्या सामन्यात फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. छोट्या आकाराच्या या स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी 400 हून अधिक धावा ठोकल्या. दरम्यान, या सामन्यात काही फलंदाजाचे दमदार शॉट्स आणि उत्तम फिल्डींगही पाहायला मिळाली. त्यातच एक म्हणजे अंजिक्य रहाणेच्या फिल्डींगने सर्वांचच लक्ष वेधलं. ग्लेन मॅक्सवेलने नवव्या षटकात दमदार षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला पण, बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या रहाणेने मात्र जबरदस्त फिल्डींग करून चेंडू अडवला. हे पाऊन सारेच चकित झाले.
पाहा व्हिडीओ : अजिंक्य रहाणेची दमदार फिल्डींग
Ajink-waah🤩
— JioCinema (@JioCinema) April 17, 2023
Rahane's 🔝effort on the boundary saves a certain maximum!#RCBvCSK #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 | @ajinkyarahane88 pic.twitter.com/8Q5YzN4nF5
अजिंक्य रहाणेने अप्रतिम फिल्डींगकडून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलने एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेन्नईच्या अजिंक्य रहाणेने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला नसता तर आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने लाँग-ऑफवर मारलेला चेंडू षटकार ठरला असता. ग्लेन मॅक्सवेलने जडेजाच्या चेंडूवर फटका मारला. यावेळी षटकार जाणार असं वाटतंच होतं. पण रहाणेने अगदी सुपरमॅन प्रमाणे उडी मारून हा चेंडू उडवला आणि बाऊंड्री लाईनच्या आत फेकला. यामुळे फलंदाजांना एकच धाव काढता आली. षटकार वाचवून रहाणेने पाच धावा वाचवल्या. हा क्षण पाहून सारेच अवाक झाले.
चेन्नईची बंगळुरुवर मात
चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पहिल्यांदा फलंदाजी करत चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 226 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ निर्धारित षटकांत फक्त 218 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात चेन्नईने आरसीबीवर आठ धावांनी विजय मिळवला. बंगळुरूसाठी झालेल्या या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने 33 चेंडूत 62 धावा आणि ग्लेन मॅक्सवेलने 36 चेंडूत 76 धावा केल्या, मात्र दोघांनाही आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.