Virat Kohli And Gautam Gambhir Video: विराट कोहली अन् गौतम गंभीरची भर मैदानात गळाभेट; रवी शास्त्री अन् सुनील गावसकरांची मजेशीर कमेंट
Virat Kohli And Gautam Gambhir Video: टाइम आऊट दरम्यान गंभीर मैदानावर आला आणि येताच त्याने सर्वप्रथम कोहलीची भेट घेतली.
RCB vs KKR Virat Kohli And Gautam Gambhir Video News Marathi: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात गेल्या हंगामात म्हणजेच IPL 2023 मध्ये जोरदार वाद झाला होता. 2023 मध्ये गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर होता, पण या सीझनमध्ये (IPL 2024) गंभीर केकेआरची मेंटरची जबाबदारी सांभाळत आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला जात आहे. त्यामुळे कोहली आणि गंभीरच्या वादामुळे केकेआर आणि आरसीबीच्या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. मात्र आज मैदानात वेगळचं घडल्याचं पाहायला मिळालं.
कोहली आणि गंभीरमध्ये वादविवाद होण्याची चाहत्यांना अपेक्षा असतानाच दोघांमध्ये आज मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले. टाइम आऊट दरम्यान गंभीर मैदानावर आला आणि येताच त्याने सर्वप्रथम कोहलीची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गंभीर येतो आणि सर्वप्रथम तो कोहलीशी हस्तांदोलन करतो आणि नंतर त्याला मिठी मारतो. यादरम्यान दोघांमध्ये काही संवाद होतो आणि दोन्ही दिग्गजांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक चाहते आश्चर्यचकित झाले.
VIDEO OF THE DAY. ⭐
— Johns. (@CricCrazyJohns) March 29, 2024
- Gambhir hugging & having a chat with Virat Kohli. pic.twitter.com/UIZfOkILCD
भारतीय संघाचे माजी दिग्गज काय म्हणाले?
विराट कोहली आणि गौतम गंभीरची मैदानात गळाभेट होताच भारतीय क्रिकेट संघाच्या दोन दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या गळाभेटीसाठी केकेआरला फेअरप्ले पुरस्कार', असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. तर 'केवळ फेअरप्ले पुरस्कारच नाही, तर ऑस्कर पुरस्कार देखील', असं सुनील गावसकर म्हणाले. सामन्यादरम्यान समालोचन करताना दोघांनी ही प्रतिक्रिया दिली.
कोहलीने स्टार्कला धुतलं-
विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावा केल्या. आयपीएल 2024 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कची विराट कोहलीने चांगलीच धुलाई केली. विराट कोहली आणि मिचेल स्टार्क पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आमनेसामने आले. स्टार्कच्या पहिल्या षटकांतील पहिल्याच चेंडूत चौकार मारत डावाची सुरुवात केली. त्यानंतर संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कला विराट कोहलीने एक खणखणीत षटकार आणि दोन चौकार लगावले.
संबंधित बातम्या:
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!