एक्स्प्लोर

Virat Kohli: 3 सामन्यात 2 अर्धशतके, केकेआरविरुद्ध 83 धावांची नाबाद खेळी; तरीही विराट कोहली होतोय ट्रोल, पाहा यामगचं कारण!

IPL 2024 Virat Kohli: आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने सलग 2 सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. मात्र असे असतानाही विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे.

IPL 2024 Virat Kohli: आयपीएल 2024 अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र गुणतालिकेत बरेच बदल होताना दिसून येत आहे. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपसाठीही मजेशीर लढाई होताना दिसत आहे. सध्या ऑरेंज कॅप विराट कोहलीकडे असून त्याने आतापर्यंत 3 सामन्यांत 90.50 च्या उत्कृष्ट सरासरीने 181 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने सलग 2 सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. मात्र असे असतानाही विराट कोहलीला ट्रोल केले जात आहे. आयपीएल 2024 च्या  पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध विराट कोहली 20 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने 49 चेंडूत 77 धावांची खेळी खेळली, ज्यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्या सामन्यातही आरसीबीला 24 चेंडूत 47 धावांची गरज असताना कोहली बाद झाला होता.

दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोरच्या खेळीने बेंगळुरूचा विजय निश्चित केला होता. परंतु कोहलीला मोठी खेळी करूनही सामना पूर्ण करण्यात अपयश आल्याने तो चाहत्यांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 83 धावांची नाबाद खेळी केली. मात्र ही खेळी 140.68 च्या स्ट्राइक रेटने आली. याचकारणामुळे कोहलीला सध्या ट्रोल करण्यात येत आहे.

एकीकडे 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी कोहलीला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी होत आहे, परंतु दुसरीकडे, त्याच्या सरासरी स्ट्राइक रेटने खेळल्यामुळे त्याला विश्वचषक संघात स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 181 धावा केल्या आहेत, मात्र त्याचा स्ट्राईक रेट केवळ 141 आहे. त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवायचे असेल तर कोहलीला धावा काढण्याबरोबरच त्याचा स्ट्राईक रेटही सुधारावा लागेल.

विराट कोहलीची एकाकी झुंज - 

बंगळुरुच्या मैदानावर कोलकात्याविरोधात आरसीबीचे खेळाडू संघर्ष करत होते. ठरावीक अंतराने विकेट फेकत होते, पण दुसऱ्या बाजूला विराट कोहली पाय रोवून उभा होता. विराट कोहलीने अखेरच्या चेंडूपर्यंत कोलकात्याचा सामना केला. विराट कोहलीने 59 चेंडूमध्ये चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावांची खेळी केली. आरसीबीने 20 षटकांत 182 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आयपीएलमध्ये लोगोपाठ दोन अर्धशतके ठोकली आहे. पण विराट कोहलीच्या संथ फलंदाजीमुळे त्याचावर काहींनी टीका केली, पण काहींनी इतरांनी साथ न दिल्यामुळे विराट कोहलीला संथ खेळावं लागलं, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

गौतम गंभीरने विराट कोहलीची भेट घेऊन मिठी का मारली?; माजी क्रिकेटपटूने सांगितली Inside Story

IPL 2024: केकेआरच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ; पाहा Latest Points Table

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget