IPL 2022 : वेंकटेशचं लाजिरवाणं प्रदर्शन, वर्ल्ड कप संघातून पत्ता कट होणार?
वेंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) यंदाची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. या हंगामात वेंकटेश अय्यरला फक्त एक अर्धशतक झळकावता आलेय.
![IPL 2022 : वेंकटेशचं लाजिरवाणं प्रदर्शन, वर्ल्ड कप संघातून पत्ता कट होणार? venkatesh iyer s performance in ipl 2022 has been very embarrassing it is decided to cut cards from world cup team IPL 2022 : वेंकटेशचं लाजिरवाणं प्रदर्शन, वर्ल्ड कप संघातून पत्ता कट होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/f4737c2d28910dd1c73114bbef4c6716_0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 15 Venkatesh Iyer's performance : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्यातील कामगिरीच्या जोरावार भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या वेंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) यंदाची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. या हंगामात वेंकटेश अय्यरला फक्त एक अर्धशतक झळकावता आलेय. त्याशिवाय फक्त दोन षटकेच गोलंदाजी केली आहे. त्यामुळे वेंकटेश अय्यरला आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणे कठीण होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, वेंटकेश अय्यरचा विश्वचषकाच्या संघातील स्थान धोक्यात आलेय. दिल्लीबरोबर झालेल्या सामन्यात वेंकटेशलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. वेंकटेशने 12 चेंडूत फक्त सहा धावा काढल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 50 राहिलाय. वेंकटेशच्या खराब कामगिरीचा फटका कोलकात्याला बसत आहे.
खराब कामगिरी -
आयपीएलच्या 15 व्या हंगामात वेंकटेश अय्यरला आपल्या कामगिरीत सातत्या राखता आलेलं नाही. वेंकटेशला आठ सामन्यात फक्त 126 धावाच करता आल्या आहेत. त्याची सरासरीही 18 इतकीच आहे. स्ट्राईक रेटही घसरला आहे. पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा काढणाऱ्या वेंकटेशला यंदा मात्र अपयश आलेय. यंदा पॉवरप्लेच्या सात डावात वेंकटेशला फक्त 77 धावा काढता आल्या आहेत. यावेळीच त्याचा स्ट्राईक रेट 90 पेक्षा कमी होता. तसेच सात डावात पाच वेळा वेंकटेश बाद झालाय. त्यामुळे भारताच्या टी 20 संघातील त्याचे स्थान धोक्यात आलेय.
हार्दिकची दमदार कामगिरी -
गुजरातच्या संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या बॅटमधून यंदा धावांचा पाऊस पडला आहे. हार्दिकने आतापर्यंत 305 धावा केल्या आहेत. त्याशिवाय चार विकेटही घेतल्या आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याचे टी 20 विश्वचषकात संघातील स्थान कायम असल्याचे म्हटले जातेय. हार्दिकची फिटनेसही आता सुधारली आहे. त्यामुळे वेंकटेश अय्यरचं संघातील स्थान धोक्यात आलेय. वेंकटेश अय्यरच्या जागी हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करु शकतो.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)