एक्स्प्लोर
Advertisement
IPL : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाऊस पाडणारे टॉप 5 महारथी; केवळ एका विदेशी खेळाडूचा समावेश
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत टॉप 5 मध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यात विराट कोहली सर्वात अव्वल स्थानावर आहे.
IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील 38 सामने पार पडले असून दररोज एक चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. 10 संघामध्ये यंदा लढत सुरु असून 29 मे रोजी आयपीएलची फायनल खेळली जाणार आहे. दरम्यान या क्रिकेटच्या महासंग्रामात दररोज षटकार आणि चौकारांची बरसात होत असते. नुकताच पंजाबचा सलामीवीर शिखर धवनने 6000 आयपीएल धावांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान आयपीएलच्या महासंग्रामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीतही शिखर सध्या दुसऱ्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर विराट कोहली विराजमान आहे. तर या टॉप रनस्कोरर खेळाडूंची यादी पाहूया...
- विराट कोहली- रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) या संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन केले आहेत. त्याने 215 सामने खेळत यामध्ये 6 हजार 411 रन केले असून विशेष म्हणजे तो पहिल्या सीजनपासून बंगळुरु संघाकडून खेळत आहे. विराटने आयपीएलमध्ये 5 शतकं आणि 42 अर्धशतकं लगावली आहेत.
- शिखर धवन- गब्बर नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शिखरने देखील नुकताच 6 हजार आयपीएल धावांचा टप्पा पार केला. शिखरने 200 सामनय्यात 6 हजार 86 रन बनवले आहेत. धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंच 2 शतकं आणि 46 अर्धशतकं लगावली आहेत. धवनने आतापर्यंत दिल्ली डेअरडेविल्स (DD), मुंबई इंडियन्स (MI), सनरायजर्स हैदराबाद (SRH), दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यासह खेळला असून यंदा तो पंजाबमध्ये आहे.
- रोहित शर्मा- आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णघार म्हणून ओळखल्या जााणाऱ्या रोहित शर्मा याने 221 सामन्यात 5 हजार 764 रन काढले आहेत. रोहित मागील बरीच वर्षे मुंबई इंडियन्समध्ये असला तरी तो डेक्कन चार्जर्समध्ये (DC) देखील खेळला आहे.
- डेविड वॉर्नर- चौथ्या स्थानावर आयपीएलमधील स्टार विदेशी खेळाडू डेव्हिड वॉर्नर आहे. वार्नरने आयपीएलमध्ये 155 सामन्यात 41.99 की शानदार सरासरीने 5 हजार 668 रन बनवले आहेत. यामध्ये 4 शतकं आणि 53 अर्धशतकं आहेत.
- सुरेश रैना- मिस्टर आयपीएएल म्हणून प्रसिद्ध सुरेश रैना यंदास्पर्धेच नाही. पण या यादीत मात्र तो पाचव्या नंबरवर आहे.त्याने 207 सामन्यात 32.52 च्या सरीसरने 5 हजार 528 रन केले आहेत. यात 1 शतक आणि 39 अर्धशतकं आहेत..
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement