(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : नाव मोठं अन् लक्षण खोटं, कमाईत आघाडीवर, धावा करण्यात पिछाडीवर, रोहित, पंतसह दिग्गजांचा समावेश
आयपीएल (IPL 2022) स्पर्धेचे लीग सामने संपले असून केवळ प्लेऑफचे सामने शिल्लक आहेत. दरम्यान यंदा अनेक स्टार खेळाडू फ्लॉप कामगिरीमुळे टीकांचे धनी झाले आहेत.
IPL 2022 : क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल 2022 (IPL 2022) आता जवळपास संपत आली आहे. 70 लीग सामने झाले आहेत. यानंतर आता चार प्लेऑफचे संघही समोर आले आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक विचित्र रिझल्ट समोर आले. सर्वात दमदार संघ चेन्नई आणि मुंबई गुणतालिकेत सर्वात तळाशी राहिले. तर नव्याने सामिल झालेले लखनौ, गुजरात संघ सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहोचले. या सर्वासोबतच दिग्गज फलंदाज यंदा अत्यंत खराब कामगिरीमुळे टीकांचे धनी झाले आहेत. या यादीतील टॉप पाच खेळाडू पाहूया...
रोहित शर्मा
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा यंदा खास कामगिरी करु शकला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित 1-2 सामने सोडल्या खास कामगिरी करु शकला नाही. रोहितने 14 सामन्यातील 14 डावात 19.14 च्या सरासरीने आणि 120.17 च्या स्ट्राईक रेटने 268 रन केले. 48 हा त्याचा सर्वोच्च स्कोर असल्याने त्याने एकही अर्धशतक ठोकलं नाही.
केईरोन पोलार्ड
मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीला जबाबदार असणारा आणखी एक खेळाडू म्हणजे संघाचा स्टार ऑलराऊंडर केईरॉन पोलार्ड. पोलार्डने आयपीएल 2022 मध्ये 11 सामन्यात 14.40 च्या सरासरीने आणि 107.46 च्या स्ट्राईक रेटने 144 रन केले. त्याने यंदा एकही अर्धशतक ठोकलं नाहीच. पण 25 इतकात त्याचा सर्वाधिक स्कोर होता.
ऋषभ पंत
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असणाऱ्या ऋषभ पंतने यंदाच्या हंगामात अत्यंत सुमार कामगिरी केली. 14 सामन्यातील 13 डावांत त्याने 30.91 च्या सरासरीने आणि 151.78 च्या स्ट्राईक रेटने 340 रन केले. विशेष म्हणजे या दरम्यान त्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. त्याचा यंदा सर्वाधिक स्कोर 44 होता.
रवींद्र जाडेजा
हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईचा कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या जाडेजाने खास कामगिरी केली नाही. नंतर कर्णधारपद पुन्हा धोनीकडे गेलं आणि अखेरच्या काही सामन्यांना तर जाडेजा संघातही नव्हता. दरम्यान जाडेजाच्या कामगिरीचा विचार करता त्याने यंदा 10 सामन्यांत 19.33 च्या सरासरीने आणि 118.36 च्या स्ट्राईक रेटने 116 रन केले. आयपीएल 2021 मध्ये शानदार फलंदाजी करणारा जाडेजा यंदा कमाल करु शकला नाही. गोलंदाजीतही जाडेजा यंदा फेल ठरला.
राहुल तेवतिया
गुजरात टायटन्सचा फिनिशर असणाऱ्या राहुल तेवतियाने मागील काही वर्षे राजस्थान संघाकडून तुफान कामगिरी केली. पण यंदा मात्र तो गुजरात संघाकडून खास कामगिरी करु शकला नाही. आयपीएल 2022 मध्ये त्याने 14 सामन्यातील 12 डावांत 31.00 च्या सरासरीने आणि 147.61 च्या स्ट्राईक रेटने 217 रन केले. त्याने एकही अर्धशतक झळकावलं नाही. 43 त्याचा सर्वाधिक स्कोर राहिला.
हे देखील वाचा-