IPL 2022 : तिन्ही हुकमी एक्के सुपरफ्लॉप, मुंबईला मोजावी लागली किंमत
IPL 2022 Marathi News : आयपीएलचा 15 वा हंगाम समारोपाकडे झुकला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील तिकीट पक्के केलेय.

IPL 2022 Marathi News : आयपीएलचा 15 वा हंगाम समारोपाकडे झुकला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमधील तिकीट पक्के केलेय. तर आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. मुंबईला 9 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. या पराभवाची अनेक कारणे असतील.. पण त्यामधील एक महत्वाचे कारण... रिटेन केलेल्या खेळाडूंची कामगिरी हे एक नक्कीच असेल.. होय... रोहित शर्मा, कायरान पोलार्ड यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. तर 15 कोटींपेक्षा जास्त रुपये मोजून घेतलेल्या इशान किशनलाही कामगिरीत सातत्य राखता आले नाही. या तीन हुकमी एक्के अपयशी ठरल्याचा फटका मुंबईला बसलाय... असे म्हटल्यास वावगे वाटायला नको..
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यंदा लयीत दिसला नाही. एखादा दुसरा डाव सोडला तर रोहित फलंदाजीत अपयशी ठरल्याचे दिसतेय. रोहितला मोठी खेळी करण्यात अपयश आलेय. याचा फटका मुंबईला बसलाय. रोहित शर्माने 12 डावात 18 च्या सरासरीने फक्त 218 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, रोहित शर्माला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. रोहितची सर्वोच्च धावसंख्या 43 आहे.
कायरन पोलार्ड -
मुंबईचा अष्टपैलू कायरन पोलार्डला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. पोलार्ड गोलंदाजी आणि फलंदाजी अपयशी ठरलाय. 11 सामन्यात पोलार्डला 14 च्या सरासरीने फक्त 144 धावाच करता आल्यात. एकही अर्धशतक झळकावता आले नाही.
ईशान किशन
मुंबईचा सलामी फलंदाज ईशान किशनला आपल्या कागिरीत सातत्य राखता आले नाही. सुरुवातीला वादळी अर्धशतक झळकावल्यानंतर फ्लॉप ठरला.. लिलावात मुंबईने ईशान किशनवर 15 कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च केले होते. यंदाच्या हंगामात ईशान किशनने 12 सामन्यात 30 च्या सरासरीने 327 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावसंख्या 81 आहे.
हे देखील वाचा-




















